सोलापूर - सिना नदीला पूर आल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सीना नदीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील घोडके वस्ती पर्यंत नदीचे पाणी आल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पाच एकरात लागवड केलेली मक्का आणि कांद्याचे पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.