सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आल्याने नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसला आहे. मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे राहणाऱ्या उषा बनसोडे यांनी कष्टाने उभा केलेला घर, दोन गाई व शेळ्या या महापुरामध्ये वाहून गेला आहे. सीना नदीला आजतागायत इतकं पाणी बघितलं नसल्याचं उषा बनसोडे यांनी सांगितलं. विदारक अवस्था पाहून उषा बनसोडे यांचे अश्रू अनावर झाले आहे.