
सोलापूर: पिकाची किंवा पालेभाज्याची लागवड करत असताना योग्य माहिती घेऊन त्याचा अभ्यास करून लागवड केल्यास कमी क्षेत्रफळामध्ये सुद्धा अधिक उत्पन्न घेता येते हे सिद्ध करून दाखवलंय. मोहोळ तालुक्यातील पेनुर गावात राहणाऱ्या अरविंद चौरे यांनी पाऊण एकारात भेंडीची लागवड केली असून यासाठी 25 हजार रुपयेपर्यंत खर्च आला आला आहे. तर सर्व खर्च वजा करून आतापर्यंत दीड लाखांचे उत्पन्न अरविंद यांना मिळाले आहे. तर भेंडीची तोडणी सुरू असून तोडणी संपेपर्यंत भेंडी विक्रीतून दोन ते अडीच लाख रुपयांचा उत्पन्न अरविंद चौरे यांना मिळणार आहे.
Last Updated: December 01, 2025, 13:33 ISTपुणे: गेल्या काही वर्षांत लिव्ह-इन रिलेशनशिपचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकत्याच येरवडा परिसरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा किरकोळ भांडणातून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणामुळे लिव्ह-इन रिलेशनशिपमधील नात्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची इच्छा यामुळे अनेक तरुण हा पर्याय निवडतात. लग्नाआधी एकत्र राहिल्यामुळे भविष्यात नातं टिकेल का नाही? याचा अंदाज घेण्यासाठी सध्याची पिढी लिव्ह-इन रिलेशनशिपकडे वळत आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये त्याचे उलट परिणामही दिसून येत आहेत.
Last Updated: December 01, 2025, 16:30 ISTपुणे: ज्या वयात मुलांना नीट हाताने जेवण सुद्धा करता येत नाही, त्या वयात पुण्यातील अवघ्या दीड वर्षांच्या नील निखिल भालेराव या चिमुकल्याने केलेल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नीलने केवळ 2 मिनिटे 53 सेकंदात जगातील 45 कार ब्रँडची अचूक ओळख सांगून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपली नोंद केली आहे. एवढ्या कमी वयात साध्य केलेल्या या उल्लेखनीय यशामुळे नीलवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीलच्या पालकांनी या रेकॉर्डविषयी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Last Updated: December 01, 2025, 15:59 ISTपुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या शैक्षणिक योजना जाहीर केल्या आहेत. ‘जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना’ ही योजना ट्रस्टने 2010 मध्ये सुरू केली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ती राबवली जाते. सध्या या योजनेअंतर्गत पुण्यातील 55 मराठी शाळांमधील 550 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व ट्रस्टकडून स्वीकारले आहे.
Last Updated: December 01, 2025, 14:09 ISTजालना: हिवाळा सुरू झालाय त्यामुळे थंडीपासून बचावासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा आधार घेतला जातो. शेकोटी, उबदार कपडे यांचा वापर शरीराला गरम ठेवण्यासाठी केला जातो. थंडीपासून संरक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून लोकरीपासून बनवण्यात आलेल्या कपड्यांना सर्वाधिक मागणी असते. ही लोकर मेंढ्यांपासून काढली जाते. मेंढ्याची लोकर नेमकी कशी कापली जाते? त्याला बाजारात दर काय मिळतो? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील लक्ष्मण बाहुले यांनी माहिती दिलीय. जालना: हिवाळा सुरू झालाय त्यामुळे थंडीपासून बचावासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा आधार घेतला जातो. शेकोटी, उबदार कपडे यांचा वापर शरीराला गरम ठेवण्यासाठी केला जातो. थंडीपासून संरक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून लोकरीपासून बनवण्यात आलेल्या कपड्यांना सर्वाधिक मागणी असते. ही लोकर मेंढ्यांपासून काढली जाते. मेंढ्याची लोकर नेमकी कशी कापली जाते? त्याला बाजारात दर काय मिळतो? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील लक्ष्मण बाहुले यांनी माहिती दिलीय.
Last Updated: December 01, 2025, 13:01 IST