
ठाणे : बदलापूरच्या रोहन कदम यांनी 13 वर्षांच्या खाद्यजगतातील अनुभवाच्या बळावर वेजिफाय नावाचा अनोखा प्युअर व्हेज कॅफे सुरू करून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. रोहन यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईतील एका प्रसिद्ध फूड इंग्रिडिएंट्स कंपनीमध्ये शेफ म्हणून कारकीर्द सुरू केली. काम करत असताना त्यांना जाणवले की स्वतःच्या स्किल्स आणि अनुभवाचा उपयोग उद्योजकतेसाठी करावा.