TRENDING:

'हमजा'चा बदला तुम्हाला महागात पडणार! महिन्याभराच्या किराणापेक्षाही महाग Dhurandhar 2 चं तिकीट, दर पाहून शॉक व्हाल

Last Updated:
Dhurandhar 2 Updates: पुढच्या आठवड्यात, १९ मार्चला हा चित्रपट रिलीज होणार असला, तरी त्याआधीच प्रेक्षकांनी तिकीट बुक करण्यासाठी जंग जंग पछाडले आहेत.
advertisement
1/8
'हमजा'चा बदला तुम्हाला महागात पडणार,महिन्याभराच्या किराणापेक्षाही महाग आहे तिकीट
बॉलिवूडमध्ये सध्या एकाच नावाची हवा आहे आणि ते नाव म्हणजे 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2). पुढच्या आठवड्यात, १९ मार्चला हा चित्रपट रिलीज होणार असला, तरी त्याआधीच प्रेक्षकांनी तिकीट बुक करण्यासाठी जंग जंग पछाडले आहेत.
advertisement
2/8
विशेष म्हणजे, तिकिटांचे दर पाहून सामान्य माणसाचे डोळे पांढरे पडतील, पण तरीही थिएटर्स आत्ताच हाऊसफुल्ल झाली आहेत. रिलीजला अद्याप ९ दिवस बाकी असतानाच या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून २० कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे.
advertisement
3/8
१८ मार्चच्या संध्याकाळपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये या चित्रपटाचे पेड प्रिव्ह्यू सुरू होणार आहेत. या प्रिव्ह्यू शोजसाठी निर्मात्यांनी तिकिटांचे दर गगनाला भिडवले आहेत. बोरीवलीतील INOX मेगाप्लेक्समध्ये एका रिक्लाइनर सीटची किंमत चक्क ३,१०० रुपये एवढी आहे. तरीही हा शो पूर्णपणे बुक झाला आहे.
advertisement
4/8
दिल्लीतील PVR सिलेक्ट सिटी वॉक मध्ये रिक्लाइनरसाठी प्रेक्षक २,४०० रुपये मोजायला तयार आहेत. IMAX साठी तिकीट १००० रुपयांच्या पुढे आहे, तर सामान्य फॉर्मेटचे सरासरी तिकीट ४१८ रुपये आहे, जे कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाच्या दुप्पट आहे.
advertisement
5/8
केवळ दक्षिणेत, विशेषतः तामिळनाडूमध्ये सरकारी नियमांमुळे तिकिटांचे दर १८० रुपयांच्या आसपास स्थिर आहेत, अन्यथा तिथेही चाहत्यांनी खिसा मोकळा करण्याची तयारी दर्शवली होती.
advertisement
6/8
'धुरंधर २' ने आतापर्यंत भारतात सुमारे ३ लाख तिकिटांची विक्री केली आहे. ज्या वेगाने हे बुकिंग सुरू आहे, ते पाहता हा चित्रपट दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणच्या 'OG' चित्रपटाचा २५ कोटींचा प्रीमियर रेकॉर्ड मोडण्याची दाट शक्यता आहे. हा चित्रपट बॉलिवूडचा आजवरचा सर्वात मोठा प्रीमियर कलेक्शन करणारा सिनेमा ठरू शकतो.
advertisement
7/8
आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट एका भारतीय जासूसाची कथा सांगतो, जो पाकिस्तानच्या भूमीवर घुसून आपल्या कुटुंबाच्या अपमानाचा बदला घेतो. रणवीर सिंगसोबत आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
8/8
२०२५ मध्ये आलेल्या पहिल्या भागाने जागतिक स्तरावर १,३०० कोटींची कमाई करून बॉलिवूडला नवी दिशा दिली होती. आता सिक्वेलकडून केवळ रेकॉर्ड मोडण्याचीच नाही, तर नवा इतिहास रचण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'हमजा'चा बदला तुम्हाला महागात पडणार! महिन्याभराच्या किराणापेक्षाही महाग Dhurandhar 2 चं तिकीट, दर पाहून शॉक व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल