TRENDING:

Coughing : खोकला का बरा होत नाही ? जाणून घ्या लक्षणं आणि खोकल्याचे प्रकार

Last Updated:

आपल्याला खोकला येताच, आपण त्याचा प्रकार माहित नसतानाही कोणतंही कफ सिरप किंवा घरगुती उपाय करतो. प्रत्येक खोकला सारखा नसतो - तो ओला किंवा कोरडा असू शकतो. खोकल्याचा प्रकार कळला की त्याची कारणं आणि उपचार ओळखायला मदत होते. दोन्हीमधे काय फरक आहे समजून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : खोकला झाला आणि त्याचं प्रमाण वाढलं तर श्वास घ्यायलाही त्रास होतो. खोकल्याचेही वेगवेगळे प्रकार असतात.
News18
News18
advertisement

आपल्याला खोकला येताच, आपण त्याचा प्रकार माहित नसतानाही कोणतंही कफ सिरप किंवा घरगुती उपाय करतो. प्रत्येक खोकला सारखा नसतो - तो ओला किंवा कोरडा असू शकतो. खोकल्याचा प्रकार कळला की त्याची कारणं आणि उपचार ओळखायला मदत होते. दोन्हीमधे काय फरक आहे समजून घेऊया.

ओला खोकला: या खोकल्यामुळे कफ निर्माण होतो.

advertisement

कोरडा खोकला: या खोकल्यामुळे कफ निर्माण होत नाही आणि त्यामुळे घशात वारंवार खाज सुटते किंवा अस्वस्थ वाटतं.

Teeth Care : मौखिक स्वच्छतेसाठी वापरा नैसर्गिक उपाय, घरी बनवा टूथपेस्ट 

या दोन्हीची कारणं वेगवेगळी आहेत. कोरडा खोकला हा जळजळ किंवा अ‍ॅलर्जीमुळे होऊ शकतो. ओला खोकला म्हणजे शरीरात संसर्ग असल्याचं निदर्शक आहे. यामुळे जास्त प्रमाणात श्लेष्मा किंवा कफ तयार होतो.

advertisement

अ‍ॅसिड रिफ्लक्स, अ‍ॅलर्जी, दमा, धूम्रपान, कोरडी हवा तसंच काही औषधांमुळेही कोरडा खोकला होऊ शकतो.

ब्रॉन्कायटिस, सर्दी, फ्लू, न्यूमोनिया यामुळे ओला खोकला होऊ शकतो. ओला खोकला असो किंवा कोरडा, काही घरगुती उपायांमुळे खोकला कमी होऊ शकतो.

खोकला कमी करण्यासाठीचे काही उपाय पाहूयात -

चहा किंवा पाणी यांसारखे गरम पेय पिणं सुरू ठेवा. तसंच नैसर्गिक मधही उपयुक्त आहे. वाफेमुळेही श्वसनाला मदत होते. तसंच भरपूर पाणी प्या.

advertisement

Menopause : रजोनिवृत्तीची चिंता करु नका, मानसिक व्यवस्थापनानं करता येईल मात

कोणती लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांना भेटायला हवं समजून घ्या:

घरघर होत असेल तर, खोकल्यातून रक्त येत असेल तर, श्वास घ्यायला त्रास होणं, तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, ताप किंवा छातीत दुखणं

खोकला टाळण्यासाठी काय करता येईल ?

advertisement

हातांच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि जेवण्याआधी हात साबणानं धुवा.

खोकताना तोंडावर हात ठेवणं टाळा; त्याऐवजी, तोंड टिश्यू पेपर किंवा कोपरानं झाका.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सहा वेळा अपयश, पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, गल्भची सैन्यात लेफ्टनंटपदी निवड
सर्व पहा

संसर्गामुळे खोकला टाळण्यासाठी, डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणं टाळा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Coughing : खोकला का बरा होत नाही ? जाणून घ्या लक्षणं आणि खोकल्याचे प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल