TRENDING:

Army : भारतीय लष्कराच्या वाहनांवर दिसणाऱ्या ‘स्टार’ चिन्हाचा अर्थ काय? फार कमी लोकांना माहिती

Last Updated:
कोणाच्या गाडीवर एक स्टार असतो, तर कोणाच्या गाडीवर चार! हे स्टार केवळ शोभेसाठी नसतात, तर त्यामागे भारतीय सैन्याची मोठी शिस्त, अधिकार आणि एक गौरवशाली इतिहास दडलेला आहे.
advertisement
1/6
लष्कराच्या वाहनांवर दिसणाऱ्या स्टार चिन्हाचा अर्थ काय? फार कमी लोकांना माहिती
रस्त्यावरून एखादी आलिशान गाडी जात असेल, तर आपण सहज त्या गाड्याच्या मॉडेलकडे पाहतो. पण जेव्हा एखादी भारतीय लष्कराची (Indian Army) गाडी समोरून जाते, तेव्हा आपली मान आदराने आपोआप झुकते. पण तुम्ही कधी एक गोष्ट नोटीस केली आहे का? की लष्करी अधिकाऱ्यांच्या गाड्यांच्या नंबर प्लेटवर किंवा पुढे काही चमकणारे 'तारे' (Stars) लावलेले असतात.
advertisement
2/6
कोणाच्या गाडीवर एक स्टार असतो, तर कोणाच्या गाडीवर चार! हे स्टार केवळ शोभेसाठी नसतात, तर त्यामागे भारतीय सैन्याची मोठी शिस्त, अधिकार आणि एक गौरवशाली इतिहास दडलेला आहे. चला तर मग, आज जाणून घेऊया लष्करी वाहनांवरील या स्टार्सचं नेमके गुपित काय आहे.
advertisement
3/6
वर्दीवरचे स्टार्स आणि गाडीवरचे स्टार्स: काय आहे फरक?लष्करी अधिकाऱ्यांच्या वर्दीवर असलेले स्टार्स हे त्यांच्या वैयक्तिक पदाची (Rank) ओळख करून देतात. मात्र, जेव्हा हेच स्टार्स गाडीवर दिसतात, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्या गाडीमध्ये त्या विशिष्ट पदाचा अधिकारी प्रवास करत आहे.
advertisement
4/6
एक महत्त्वाची अटहे स्टार्स गाडीवर तेव्हाच दिसतात, जेव्हा संबंधित अधिकारी पूर्ण गणवेशात (Uniform) आणि कर्तव्यावर (On Duty) असतो. जर अधिकारी सुट्टीवर असेल किंवा गणवेशात नसेल, तर हे स्टार्स झाकून ठेवले जातात किंवा काढून टाकले जातात.
advertisement
5/6
कोणाच्या गाडीवर किती स्टार्स?भारतीय सैन्यात 'कर्नल' रँकच्या वरील अधिकाऱ्यांनाच आपल्या वाहनावर स्टार लावण्याचा मान मिळतो. पद आणि ताऱ्यांचे गणित खालीलप्रमाणे असते.
advertisement
6/6
लष्करी वाहनांची नंबर प्लेट ही सामान्य गाड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. त्यावर वरच्या दिशेला टोक असलेला एक रुंद 'बाण' (Arrow) असतो. याला 'ब्रॉड ॲरो' म्हणतात. हा ब्रिटीश काळापासून चालत आलेला वारसा असून, ती सरकारी मालमत्ता असल्याचे प्रतीक आहे. या बाणानंतर गाडी कोणत्या वर्षी सैन्यात दाखल झाली, त्याचे वर्ष लिहिलेले असते.तसेच, ताऱ्यांसोबतच गाडीवर असणारा झेंडाही खूप काही सांगून जातो. जनरल रँकच्या अधिकाऱ्यांच्या गाडीवर लष्कराचा अधिकृत ध्वज असतो, तर इतर कमांडर्सच्या गाडीवर त्यांच्या युनिटचे स्वतंत्र झेंडे असतात. हे प्रतीक केवळ शिस्तच नाही, तर सुरक्षा यंत्रणांना गाडीत बसलेल्या अधिकाऱ्याचा दर्जा ओळखून योग्य ती सुरक्षा पुरवण्यास मदत करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Army : भारतीय लष्कराच्या वाहनांवर दिसणाऱ्या ‘स्टार’ चिन्हाचा अर्थ काय? फार कमी लोकांना माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल