TRENDING:

15 मार्चला न चुकता करा 'ही' 6 काम, सर्व पापातून मिळेल सुटका; सदैव राहील भगवान विष्णूंची कृपा

Last Updated:
यंदा पापमोचनी एकादशी रविवार, 15 मार्च 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी सर्व प्रकारच्या न कळत घडलेल्या पापांतून मुक्ती देणारी मानली जाते.
advertisement
1/7
15 मार्चला न चुकता करा 'ही' 6 काम, सर्व पापातून मिळेल सुटका
यंदा पापमोचनी एकादशी रविवार, 15 मार्च 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी सर्व प्रकारच्या न कळत घडलेल्या पापांतून मुक्ती देणारी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील संकटे दूर होऊन सुख-समृद्धी लाभते.
advertisement
2/7
ब्रह्ममुहूर्तावर स्नान आणि संकल्प: एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंसमोर हात जोडून व्रत पाळण्याचा संकल्प करावा. यामुळे मनाला शुद्धता प्राप्त होते आणि व्रताचे पूर्ण फळ मिळते.
advertisement
3/7
विष्णू सहस्रनामाचे पठण: या दिवशी भगवान विष्णूंच्या 'विष्णू सहस्रनाम' स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. जर पठण करणे शक्य नसेल, तर ते श्रवण करावे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि मानसिक शांती लाभते.
advertisement
4/7
तुळशीची विशेष सेवा: एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करून तिच्याभोवती प्रदक्षिणा घालावी. संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावावा. लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी विसरूनही तुळशीची पाने तोडू नका; पूजेसाठी पाने आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत.
advertisement
5/7
पिवळ्या वस्तूंचे दान: भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. या दिवशी गरजू व्यक्तींना पिवळे धान्य, पिवळी फळे, किंवा पिवळे वस्त्र दान करावे. दानामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि कुंडलीतील 'गुरु' ग्रह मजबूत होतो.
advertisement
6/7
अखंड नामस्मरण आणि मंत्रजाप: दिवसभर मनातल्या मनात 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा. तसेच रात्री जागरण करून भजन-कीर्तनात वेळ घालवावा. एकादशीची रात्र जागून काढल्याने विष्णूलोकाची प्राप्ती होते, असे शास्त्रात सांगितले आहे.
advertisement
7/7
क्षमा प्रार्थना: या एकादशीचे नावच 'पापमोचनी' आहे. पूजेच्या शेवटी भगवान विष्णूंकडे आपल्याकडून अजाणतेपणी घडलेल्या चुकांची किंवा पापांची मनापासून क्षमा मागावी. खऱ्या भावनेने केलेली क्षमा प्रार्थना मनुष्याला पापमुक्त करून नवीन सुरुवातीची प्रेरणा देते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
15 मार्चला न चुकता करा 'ही' 6 काम, सर्व पापातून मिळेल सुटका; सदैव राहील भगवान विष्णूंची कृपा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल