TRENDING:

Georgia : जॉर्जियाच्या रिसॉर्टमध्ये 12 भारतीयांचा मृत्यू कसा झाला? धक्कादायक माहिती समोर

Last Updated:

रशियाचा शेजारी देश असलेल्या जॉर्जियामधल्या एका रिसॉर्टमध्ये 12 भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जॉर्जिया : रशियाचा शेजारी देश असलेल्या जॉर्जियामधल्या एका रिसॉर्टमध्ये 12 भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जॉर्जियामधल्या भारतीय उच्चायुक्ताने याची पुष्टीही केली आहे. कार्बन मोनोऑक्साईडच्या विषामुळे या 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जॉर्जियाच्या रिसॉर्टमध्ये 12 भारतीयांचा मृत्यू कसा झाला? धक्कादायक माहिती समोर
जॉर्जियाच्या रिसॉर्टमध्ये 12 भारतीयांचा मृत्यू कसा झाला? धक्कादायक माहिती समोर
advertisement

त्बिलिसीमधील भारतीय दूतावास तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. लवकरच मृत्यू झालेल्यांचं पार्थिव भारतात आणलं जाणार आहे. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, त्यांना संपूर्ण मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलं आहे.

मृत्यूचं धक्कादायक कारण

जॉर्जियाच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये शुक्रवारी रात्री हे सर्व 12 जण झोपायला गेले होते, तेव्हा रात्री वीजपुरवठा खंडित झाला, त्यानंतर हा जनरेटर सुरू केला गेला, पण याच जनरेटरमधून विषारी कार्बन मोनोऑक्साईड बाहेर पडायला सुरूवात झाली आणि 12 जणांना जीव गमावावा लागला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. 12 जणांच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी मृतदेहांची फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

मृत्यू झालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या शरिरावर हिंसाचार झाल्याच्या खुणा नाहीत किंवा मारहाणीच्या कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत, असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे. मृत्यू झालेल्या सर्व भारतीयांचे मृतदेह रिसॉर्टच्या दुसऱ्या मजल्यावरच्या रेस्ट एरियामध्ये मिळाले आहेत. हे सगळे 12 जण रिसॉर्टमध्येच काम करत होते.

मराठी बातम्या/विदेश/
Georgia : जॉर्जियाच्या रिसॉर्टमध्ये 12 भारतीयांचा मृत्यू कसा झाला? धक्कादायक माहिती समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल