तर स्थानिक मीडियाने पोलिसांचा हवाला देत सांगितले की, सर्व बळींचा मृत्यू विषारी कार्बन मोनोऑक्साइडमुळे झाला. तिबिलिसीतील भारतीय उच्चायुक्ताने सांगितले की मृत अवस्थेत सापडलेले सर्व 12 भारतीय नागरिक आहेत. जॉर्जियाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की मृतांपैकी 11 परदेशी होते तर एक पीडित नागरिक होता. निवेदनात असेही म्हटले आहे की, सर्व पीडितांचे मृतदेह रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये सापडले आहेत. जे त्याच रेस्टॉरंटचे कर्मचारी होते.
advertisement
भारतीय उच्चायुक्ताने एका निवेदनात म्हटले आहे की, ' नुकतेच जॉर्जियातील गुदौरी येथे 12 भारतीय नागरिकांच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. प्राण गमावलेल्या भारतीय नागरिकांची माहिती मिळविण्यासाठी आयुक्तालय स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. सर्व कुटुंबांना शक्य ती मदत केली जाईल.' पोलिसांनी जॉर्जियाच्या फौजदारी संहितेच्या कलम 116 अंतर्गत (निष्काळजीपणामुळे हत्या) तपास सुरू केला आहे.
प्राथमिक तपासानुसार, बेडरूमजवळील एका बंद जागेत जनरेटर ठेवण्यात आला होता. जो बहुधा शुक्रवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सुरू झाला होता. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक वैद्यकीय तपासणीही केली जात आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी फॉरेन्सिक क्राईम टीमसोबत काम करत आहेत आणि या प्रकरणाशी संबंधित लोकांची चौकशी केली जात आहे.
