TRENDING:

ind vs pak war: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये किती दहशतवादी मेले अन् भारताचे 5 फायटर जेट.., पाकच्या पंतप्रधानांची नवी बडबड!

Last Updated:

या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले याबद्दल पाकिस्तान वारंवार आकडेवारी बदलत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकव्याप्त भागातील ९ दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले याबद्दल पाकिस्तान वारंवार आकडेवारी बदलत आहे. अखेरीस पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानला उद्देशून केलेल्या भाषणात 26 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले अशी कबुली दिली आहे. तसंच, भारताला याचा किंमत मोजावी लागेल, असा इशाराच शरीफ यांनी दिला.
News18
News18
advertisement

भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान थयथयाट सुरू झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिवसातून आता तिसऱ्यांदा ऑपरेशन सिंदूर कसं फेलं गेलं, याची माहिती आपल्या जनतेला दिली. भारताने जो हल्ला केला, त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. भारत हे विसरला आहे की आमच्या इथं बहाद्दुर लोकांची माणसं आहे. आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्यासाठी तयार आहोत, अशी बडबड शरीफ यांनी आपल्या भाषणात केली.

advertisement

तसंच, मगळवारी रात्री संपूर्ण जगाने पाहिलं की भारताला गुडघ्यावर आणण्याला आम्हाला काही तास लागले. भारताला त्यांच्या ५ फायटर जेट विमानांवर अभिमान होता. आता ते पाकच्या जमिनीत जमीनदोस्त झाले आहे. हे आमचं उत्तर होतं. भारताच्या हल्ल्यात 26 पाकिस्‍तानी शहरी नागरिक मारले गेले तर 40 जण जखमी झाले आहे, असा दावा शरीफ यांनी केला.

advertisement

पाक सैन्याने सांगितला वेगळाच आकडा

दरम्यान,  दिवसभरापासून पाकिस्तान मृतांची संख्या लपवण्याचा ड्रामा करत आहे. याआधीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले होते की, या हल्ल्यांमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ४६ जण जखमी झाले आहेत. पण अवघ्या ५ मिनिटांनी, जेव्हा पाकिस्तानी सैन्याने ब्रीफिंग दिली तेव्हा मृतांची संख्या ३१ असल्याचं सांगितलं.

advertisement

आकडेवारीतील या तफावतीमुळे पाकिस्तान मृतांची खरी संख्या लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, हल्ल्यात मारले गेलेले बहुतेक लोक दहशतवादी छावण्यांमध्ये लपलेले दहशतवादी होते. पाकिस्तानी माध्यमांमध्ये मृतांच्या संख्येबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. काही अहवालांमध्ये आठ ते २६ मृत्यूंचा उल्लेख आहे, तर काहींमध्ये ही संख्या ३१ इतकी आहे. आयएसपीआरच्या डीजीने पुष्टी केली आहे की पंजाब आणि एजेकेच्या ६ ठिकाणी भारतीय हल्ल्यात आतापर्यंत ३१ पाकिस्तानी शहीद झाले आहेत आणि ५७ हून अधिक जखमी झाले आहेत.

advertisement

हल्ल्यांनंतर पाकमध्ये भयभीत वातावरण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, भारतीय हल्ल्यांनंतर या भागात अराजकता पसरली होती. बहावलपूर, मुझफ्फराबाद, रावलकोट, कोटली आणि चकवाल सारख्या भागात लोक इतके घाबरले की त्यांनी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी पळ काढला. रुग्णालयांमध्ये आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आल्या आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या. अहवालांनुसार, रुग्णालयं लोकांनी भरलेली आहेत. रस्त्यांवर अजूनही रुग्णवाहिका फिरताना दिसतात.  दरम्यान, पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी भारतावरच आरोप केलाय. 'भारताने संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशाची शांतता आणि स्थैर्य धोक्यात आणली आहे आणि त्याच्या शत्रुत्वपूर्ण कृतींचे या प्रदेशासाठी धोकादायक परिणाम होतील. इटलीचे गृहमंत्री मॅटेओ पिआन्टेडोसी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.

मराठी बातम्या/विदेश/
ind vs pak war: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये किती दहशतवादी मेले अन् भारताचे 5 फायटर जेट.., पाकच्या पंतप्रधानांची नवी बडबड!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल