इस्रायलमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. इस्रायच्या बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांश कामगार हे गाझा पट्टीतून आलेले आहेत. मात्र हमाससोबत युद्ध सुरू झाल्यानंतर यातील अनेक कामगारांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे 17 हजार कामगार हे पु्न्हा एकदा गाझा पट्टीत परतल्यानं इस्रायलमध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता भारतीय कामगार इस्रायला जाणार आहेत.
advertisement
इस्रायलमध्ये बांधकाम क्षेत्रात मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक सरकारी प्रकल्प रखडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांमध्ये झालेल्या G2G करारांतर्गत भारतीय कामगार आता इस्रायला जाणार आहेत.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
April 11, 2024 7:32 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Israel Hamas War : हमाससोबत युद्ध सुरू असतानाच 6 हजार भारतीय इस्रायलला जाणार; समोर आलं मोठं कारण
