मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रवासी विमान अमेरिकेतील कॅन्सस सिटीहून वॉशिंग्टनला येत होते. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने एका निवेदनात म्हटले आहे की, वॉशिंग्टन डीसीच्या रीगन राष्ट्रीय विमानतळाजवळ उतरण्यापूर्वी विमान हवेतच यूएस आर्मीच्या सिरोस्की एच-60 हेलिकॉप्टरला धडकलं. अपघातानंतर हे विमान पोटोमॅक नदीत कोसळले.
विमानात होते 60 प्रवासी
सीएनएनच्या वृत्तानुसार, कॅन्ससमधील अमेरिकन सिनेटर रॉजर मार्शल यांनी सांगितलं की, ज्या हेलिकॉप्टरला प्रवासी विमान धडकले आहे, ते हेलिकॉप्टर अमेरिकन सैन्याचे होते. तसेच, विमानात 60 लोक होते. मार्शल यांनी X अकाऊंटवर लिहिलं की, 'बुधवारी आम्हाला दु:खद बातमी मिळाली. ही बातमी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. सुमारे 60 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान वॉशिंग्टन डीसीमधील रीगन विमानतळावर लँडींग करत होतं. यावेळी हवेतच विमानाची धडक लष्करी हेलिकॉप्टरला बसली आहे.
advertisement
सर्व उड्डाणे रद्द
सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये रीगन विमानतळावर उतरताना विमान एका हेलिकॉप्टरला कसे धडकले आणि नंतर नदीत पडले हे दाखवण्यात आले. या घटनेनंतर वॉशिंग्टन विमानतळावरील सर्व उड्डाणे रोखण्यात आली आहेत. या अपघाताचा एक व्हिडीओ समोर येत आहे. यात विमान हवेतून विमानतळावर लँडींग करताना दिसत आहे. मात्र विमान हवेत असताना विमानाच्या मार्गात लष्कराचं हेलिकॉप्टर येतं आणि दोन्ही एअरक्राफ्टची हवेतच धडक होते. अपघातानंतर आकाशात मोठा आगीचा भडका झाल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.
