युरोपियन स्पेस एजन्सीने (ईएसए) दिलेल्या माहितीनुसार, या लघुग्रहाचा व्यास 70 सेंटिमीटर (27.5 इंच) पेक्षा कमी आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याच्या एक दिवस अगोदर तो दिसला. त्याचा आकार लहान असल्याने शास्त्रज्ञांनी त्याची नोंद 'हार्मलेस' श्रेणीमध्ये केली आहे.
ईएसने सांगितलं की, सेंट्रल युरोपियन टाईमनुसार संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी (पूर्वेकडील वेळेनुसार सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी), रशियन रिपब्लिक ऑफ याकुतियातील रहिवाशांना उत्तर सैबेरियातील आकाशात एका सुंदर फायरबॉलचं दर्शन झालं.
advertisement
ईएसएने याबाबत एक्सवर एक ट्विट केलं आहे. एजन्सी म्हणाली, "#C0WEPC5 नावाच्या लघुग्रहाने सेंट्रल युरोपियन टाईमनुसार संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. याकुतिया प्रदेशातील लोकांना त्याचं दर्शन झालं. शास्त्रज्ञांना साधारण 12 तासांपूर्वी 70 सेंटिमीटर व्यासाचा हा गोळा पहिल्यांदा दिला होता. जगभरातील खगोलशास्त्रज्ञांच्या निरीक्षणाच्या मदतीने, आमच्या अलर्ट सिस्टीमला +/- 10 सेंकदांच्या आत त्याच्या प्रभावाचा अंदाज लावता आला."
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या 'नासा'ने देखील या लघुग्रहाला निरुपद्रवी फायरबॉल म्हटलं आहे. या लघुग्रहाचा अप्रोच शोधल्याबद्दल नासाने ॲरिझोना युनिव्हर्सिटीतील बोक टेलिस्कोपला श्रेय दिलं आहे. C0WEPC5 मुळे पृथ्वीवर कोणतंही नुकसान किंवा दुखापत झाली नाही.
गेल्या काही महिन्यांमध्ये पृथ्वीच्या आसपास अनेक लघुग्रह आले होते. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर महिन्यात '2024 ऑन' आणि 'अपोफिस 99942' नावाचे दोन लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने आले होते.
