बलुच बंडखोरांनी सांगितले की, आम्ही युद्धकैद्यांच्या देवाणघेवाणीसाठी पाकिस्तानी सैन्याला 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. जीव वाचवण्याची ही त्यांच्यासाठी शेवटची संधी होती. पण नेहमीप्रमाणे, त्यांनी अहंकार दाखवला. पाकिस्तानने कोणतीही चर्चा झाली नाही. वास्तव माहीत असूनही, त्यांनी याकडे डोळेझाक केली. पाकिस्तानी सैन्य आणि सरकारच्या या हट्टीपणामुळे आम्ही सर्व 214 ओलिसांना मारले आहे, असं बलुच लिबरेशन आर्मीकडून सांगितलं गेलं आहे.
advertisement
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने म्हटले आहे की, बीएलए नेहमीच युद्धाच्या तत्त्वांनुसार आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काम करत आहे, पण आपल्या सैनिकांचे प्राण वाचवण्याऐवजी, पाकिस्तान सरकारने युद्धात त्यांचे बलिदान देणे योग्य मानले. पाकिस्तानला या जिद्दीची किंमत 214 सैनिकांच्या मृत्यूच्या रूपात मोजावी लागली.
12 बीएलए सैनिक ठार
बलुच बंडखोरांनी असेही म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्यासोबतच्या चकमकीत त्यांचे 12 सैनिक मारले गेले आहेत. मृत्यू झालेल्या बलुच सैनिकांना बलुच लिब्रेशन आर्मीने श्रद्धांजली वाहिली आहे. या सैनिकांनी शत्रूविरुद्ध अविस्मरणीय बलिदान दिले, असं म्हणत बीएलएने त्यांचा उल्लेख स्वातंत्र्यसैनिक असा केला आहे. 'बुधवारी रात्री 3 आणि गुरूवारी रात्री 4 स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले. याशिवाय माजीद ब्रिगेडच्या 5 जणांनीही आपल्या प्राणाची आहुती देत शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं. इतिहास नेहमीच त्यांना लक्षात ठेवेल', असं प्रसिद्धी पत्रक बलुच लिबरेशन आर्मीकडून काढण्यात आलं आहे.
