विमान अपघातानंतर स्फोटाचा आवाज आला आणि आग लागली. या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले, त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या लोकांवर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान प्रथम इमारतीच्या चिमणीला धडकले. मग एका घराच्या दुसऱ्या मजल्यावरून. शेवटी एका फर्निचरच्या दुकानावर पडला. विमानाच्या ढिगाऱ्यामुळे जवळच्या एका गेस्ट हाऊसचेही नुकसान झाले.
advertisement
JUST IN
Brazil
A plane carrying 10 people crashed into multiple buildings in Gramado.
Unfortunately, there are no survivors. pic.twitter.com/dX5YsS9fAN
— Open Source Intel (@Osint613) December 22, 2024
रिओ ग्रांदे डो सुल येथील कॅनेला येथून विमानाने उड्डाण केले होते. ग्रामाडो हे ब्राझीलमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे डोंगराळ भागात वसलेले असून येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. ख्रिसमसच्या काही दिवस आधी हा अपघात झाला. ग्रामाडोमध्ये जेव्हा सणासुदीची तयारी जोरात सुरू होती. ख्रिसमसच्या काळात सजावट आणि उत्सवासाठी हे शहर प्रसिद्ध आहे.
ख्रिसमसचा उत्साह सगळीकडे असताना असा अपघात झाल्यानं शहरात शोककळा पसरली आहे. आनंद एका क्षणात दु:खात बदलला आणि होत्याचं नव्हतं झालं. या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. विमान अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही.
