नेमका वाद काय?
३० जुलै २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली यांच्यात एक ऐतिहासिक व्यापार करार झाला होता. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी या कराराच्या अटींवर दोन्ही देशांनी शिक्कामोर्तबही केले होते. मात्र, दक्षिण कोरियाच्या संसदेने अद्याप या कराराला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. आपल्या देशाच्या संसदेने त्वरित कारवाई केली असताना, दक्षिण कोरियाने टाळाटाळ का केली? असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे.
advertisement
कोणत्या वस्तूंवर बसणार फटका?
ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत दक्षिण कोरियाची संसद या कराराचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत खालील वस्तूंवर वाढीव टॅरिफ लागू राहतील:
ऑटोमोबाईल: दक्षिण कोरियाच्या गाड्या अमेरिकन मार्केटमध्ये महागणार.
फार्मा : औषध क्षेत्रातील निर्यातीवर मोठा परिणाम होणार.
लाकूड आणि इतर वस्तू: सध्या असलेले १५% टॅरिफ आता २५% केले जाणार आहेत.
'आम्ही वाट पाहणार नाही', ट्रम्प यांचा इशारा
"आम्ही आमच्या बाजूने टॅरिफ कमी करण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवली, पण दक्षिण कोरियाकडून तशी अपेक्षा फोल ठरली आहे. कराराचे पालन न करणे हा त्यांचा विशेषाधिकार असला, तरी टॅरिफ वाढवणे हा आमचा अधिकार आहे," अशा शब्दांत ट्रम्प यांनी दक्षिण कोरियावर दबाव निर्माण केला आहे.
या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत, विशेषतः ऑटो आणि टेक इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्याचा परिणाम शेअर मार्केटवरही होऊ शकतो. आज शेअर मार्केट कोसळणार का? भारतीय शेअर मार्केटवर, टेक सेक्टर, ऑटो मोबाईल सेक्टरवर याचा काय परिणाम होतो ते पाहावं लागणार आहे.
