सर्वेक्षणात मस्क यांनी लोकांना विचारले होते की, 'तुम्हाला द्विपक्षीय व्यवस्थेपासून स्वातंत्र्य हवे आहे का? आपण 'द अमेरिका पार्टी' स्थापन करावी का?' सर्वेक्षणात ६५.४% लोकांनी 'हो' असे उत्तर दिले, तर ३४.६% लोकांनी 'नाही' असे उत्तर दिले. या सर्वेक्षणाचा हवाला देत मस्क यांनी लिहिले की, '२:१ च्या प्रमाणात, जनतेने म्हटले आहे की त्यांना एक नवीन पक्ष हवा आहे आणि आता त्यांना तो मिळत आहे.'
advertisement
अमेरिकेच्या सध्याच्या राजकारणावर हल्ला चढवत मस्क म्हणाले, 'आपण लोकशाहीत राहत नाही, तर अशा पक्षाच्या राजवटीत राहतोय, जो देशाला विनाश आणि भ्रष्टाचाराकडे ढकलत आहे.' ट्रम्प यांच्याशी सार्वजनिक मतभेद झाल्यानंतर, मस्क यांनी अनेक वेळा संकेत दिले होते की ते एक नवीन पक्ष सुरू करू शकतात, परंतु आता त्यांनी थेट नवीन पक्षाची घोषणा केली आहे.
आतापर्यंत 'द अमेरिका पक्षा'ची रूपरेषा, धोरणे किंवा संभाव्य उमेदवारांबद्दल काहीही स्पष्टता नाही. परंतु हे निश्चित आहे की एलन मस्कच्या राजकारणातील प्रवेशामुळे अमेरिकेतील राजकीय समीकरणं बदलू शकतात. तंत्रज्ञान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आग्रही असणाऱ्या मस्क यांनी अमेरिकन जनतेच्या मोठ्या वर्गात आधीच लोकप्रियता मिळवली आहे. ट्रम्प यांना निवडून आणण्यात देखील त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. आता ते स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.