TRENDING:

IND vs PAK : पाकिस्तानचा 'तिसरा डोळा' फोडला, भारतीय सैन्यानं हवेत केले तुकडे, भारतावर ठेवत होता नजर

Last Updated:

पाकिस्तानकडे असलेले हे विशेष AWACS भारताच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली: भारत-पाकिस्तानमध्ये एकाप्रकारे आता युद्धाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं जशास तसे उत्तर दिले आहे. भारतीय सैन्याला मोठं  यश मिळवलं आहे. भारतीय हवाई दलाने सर्वात आधुनिक एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (AWACS) नष्ट केली आहे, ही तांत्रिक प्रणाली ज्याद्वारे पाकिस्तान भारतीय हवाई क्षेत्रावर बारकाईने लक्ष ठेवत होता. ती अचूकपणे लक्ष्य करून नष्ट केली आहे. AWACS ला कोणत्याही आधुनिक हवाई दलाचे 'डोळे आणि कान' मानले जाते. या हाय-टेक रडार सिस्टीम विमानांवर बसवल्या जातात, ज्या शेकडो किलोमीटर अंतरावरून आकाशात उडणाऱ्या शत्रूच्या विमानांच्या, क्षेपणास्त्रांच्या आणि ड्रोनच्या हालचाली शोधण्यास सक्षम असतात.
News18
News18
advertisement

AWACS 360-डिग्री रडार काय आहे?

- ही विमाने त्यांच्या आजूबाजूला सुमारे 400-600 किलोमीटरपर्यंत हवाई देखरेख करू शकतात.

एअर कमांड सेंटर- हे केवळ आकाशात उडणाऱ्या इतर लढाऊ विमानांवर लक्ष ठेवत नाही तर त्यांना सूचना देखील देते. म्हणजे ते एक उडणारे नियंत्रण कक्ष आहे. पाळत ठेवणे

- जमिनीवरून हवेत आणि हवेतून हवेत होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवणे. AWACS शत्रूच्या कोणत्याही हवाई हल्ल्याची आगाऊ सूचना देऊ शकते. रडार थांबवण्यास सक्षम

advertisement

- या प्रणालीमध्ये शत्रूच्या रडार आणि संप्रेषण प्रणालींना विस्कळीत करण्याची क्षमता देखील आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, सोयाबीन आणि कांद्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानकडे असलेले हे विशेष AWACS भारताच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. पण भारतीय गुप्तचर संस्था आणि हवाई दलाने ते पाडले. भारतीय लष्कराच्या या कारवाईकडे एक धोरणात्मक फायदा म्हणून पाहिले जात आहे. हे केवळ पाकिस्तानच्या हवाई देखरेख यंत्रणेला मोठा धक्का नाही तर युद्धक्षेत्रात भारताची तांत्रिक धार देखील दर्शवते.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
IND vs PAK : पाकिस्तानचा 'तिसरा डोळा' फोडला, भारतीय सैन्यानं हवेत केले तुकडे, भारतावर ठेवत होता नजर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल