विमानतळावर त्यांच्या बॅगेतील पॉवर बँकवर संशय घेतल्यामुळे त्यांना अडवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक त्रास देणारी वागणूक झाली. श्रुती चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, तपासणीदरम्यान त्यांनी स्पष्टपणे महिला अधिकाऱ्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पुरुष अधिकाऱ्यांकडून त्यांची शारीरिक तपासणी करण्यात आली. थंडी असतानाही त्यांचे गरम कपडे काढून घेण्यात आले. त्यांना स्वतःचा फोन वापरण्याची किंवा पाकीट हातात ठेवण्याचीही परवानगी देण्यात आली नाही.
advertisement
एका थंड खोलीत त्यांना अनेक तास बसवून ठेवण्यात आलं आणि शौचालय वापरण्याचीही परवानगी नाकारण्यात आली. या सगळ्या प्रकारांमुळे त्यांची फ्लाईट चुकली. ही संपूर्ण तपासणी प्रक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आल्याचंही श्रुती यांनी नमूद केलं असून, हा अनुभव मानसिकदृष्ट्या अतिशय त्रासदायक ठरल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला टॅग करत सवाल केला आहे की, “भारतीय नागरिकांना परदेशात सन्मानाने वागणुकीचा अधिकार नाही का? माझ्यासोबत अशी वागणूक का करण्यात आली?” या प्रकरणावर अमेरिकन विमानतळ प्रशासन किंवा भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
