TRENDING:

Iran Attack Saudi Arabia: जगाची 'लाईफलाईन' रोखली! इराणचा सौदी अरामकोवर भीषण प्रहार, इंधन टंचाईच्या धास्तीने जग हादरलं

Last Updated:

Iran Attack Saudi Arabia :स्रायल-इराण युद्धाच्या तिसऱ्या दिवशी इराणने सौदीच्या अरामको प्रकल्पावर मोठा हल्ला केला आहे. हिजबुल्लाच्या प्रवेशामुळे आणि तेल पुरवठा खंडित झाल्यामुळे जगावर मोठं संकट ओढवलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Iran Attack Saudi Arabia : इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाने आज तिसऱ्या दिवशी अत्यंत रौद्र रूप धारण केले आहे. सर्वोच्च नेते अय्यातुला खामेनी यांच्या मृत्यूनंतर जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचे इराणनं जाहीर केलं होतं. त्यानंतर मध्यरात्रीपासून इराणने अमेरिका आणि इस्रायलवर जोरदार क्षेपणास्त्र डागली आहेत. आपल्या शेजारच्या देशात असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना इराणने लक्ष्य केले. या हल्ल्यात अमेरिकेचे मोठं नुकसान झाल्याचा दावा इराणने केला. तर, सौदी अरेबियावर ही मोठा हल्ला इराणने केला आहे. अमेरिकेला सौदीने हल्ला करण्यासाठी उकसवलं असल्याचे वृत्त समोर आले असताना इराणने हा हल्ला केला आहे.
इस्रायल, कुवेतनंतर इराणचा सगळ्यात मोठा वार! सौदी हादरला, जगाचं टेन्शन वाढलं, अरामको रिफायनरीवर ड्रोन अॅटक
इस्रायल, कुवेतनंतर इराणचा सगळ्यात मोठा वार! सौदी हादरला, जगाचं टेन्शन वाढलं, अरामको रिफायनरीवर ड्रोन अॅटक
advertisement

इराणने जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियाच्या 'रास तनुरा' (Ras Tanura) प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.सौदी अरामकोचा हा प्रकल्प या हल्ल्यानंतर पूर्णपणे बंद करण्यात आला असून, यामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. इराणच्या हल्ल्यात सौदी अरामकोचं नेमकं किती नुकसान झालं आहे, याची माहिती समोर आली नाही. इराणने हा हल्ला ड्रोनद्वारे केला असल्याचे म्हटले जाते.

advertisement

जगाचा तेल पुरवठा धोक्यात

रास तनुरा हा जगातील सर्वात मोठ्या ऑफशोअर ऑइल लोडिंग टर्मिनल्सपैकी एक आहे. येथून दररोज ५.५ ते ६ लाख बॅरल तेल अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांना पाठवले जाते. इराणच्या या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती असून इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

हिजबुल्लाचीही युद्धात एन्ट्री, खामेनींच्या मृत्यूचा बदला घेणार

advertisement

दुसरीकडे, लेबनॉनमधील संघटना 'हिजबुल्ला' अधिकृतपणे या युद्धात सामील झाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचे जाहीर करत हिजबुल्लाने इस्रायलमधील अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव केला. इराणने केवळ इस्रायलच नव्हे तर कतार, बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीलाही लक्ष्य केल्याने संपूर्ण आखाती देश युद्धाच्या आगीत होरपळत आहेत. इस्रायलने देखील 'हिजबुल्ला'च्या लेबनॉनमधील ठिकाणांवर हल्ला केला.

advertisement

चर्चेचे दरवाजे बंद

दरम्यान, इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी अमेरिकेसोबतच्या कोणत्याही चर्चेची शक्यता फेटाळून लावली आहे. "इराण अमेरिकेशी कोणतीही चर्चा करणार नाही," असे स्पष्ट करत त्यांनी युद्धाचे संकेत दिले आहेत. यामुळे आता हे युद्ध थांबण्याऐवजी अधिक भीषण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सौदी अरामको महत्त्वाचा का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
33 खंड प्रकाशित, संशोधकांसाठी संधी, डेक्कन कॉलेजमध्ये सर्वात मोठी संस्कृत डिक्शन
सर्व पहा

सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठ्या तेल आणि वायू कंपन्यांपैकी एक आहे. ती सौदी अरेबिया सरकारच्या मालकीची आहे. अमेरिकन कंपन्यांशी झालेल्या करारानुसार १९३३ मध्ये ती स्थापन झाली. १९८० मध्ये, ती पूर्णपणे सौदी सरकारच्या नियंत्रणाखाली आली. कंपनीचे मुख्यालय धाहरान येथे आहे. अरामकोकडे जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यांपैकी एक आहे. सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था या कंपनीच्या महसुलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अरामको केवळ कच्च्या तेलाचे उत्पादन करत नाही तर शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स आणि नैसर्गिक वायूमध्ये देखील गुंतलेली आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Iran Attack Saudi Arabia: जगाची 'लाईफलाईन' रोखली! इराणचा सौदी अरामकोवर भीषण प्रहार, इंधन टंचाईच्या धास्तीने जग हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल