इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या काही काळापूर्वीच कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते कारण तेहरानने अमेरिकेविरुद्ध प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती. कतारमध्ये अल उदेद हवाईतळ आहे. जो अमेरिकन लष्कराचा एक प्रमुख तळ आहे. अमेरिकन तळावर हल्ल्यानंतर लगेचच, इराणने जाहीर केलं की, त्यांनी कतारच्या अल उदेद हवाई तळावर तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यावर हल्ला केला आहे. ही घोषणा सरकारी टेलिव्हिजनवर मार्शल संगीत वाजवत करण्यात आली. टीव्ही स्क्रीनवरील कॅप्शनमध्ये "अमेरिकेच्या आक्रमणाला इराणच्या सशस्त्र दलांनी दिलेला एक शक्तिशाली आणि यशस्वी प्रत्युत्तर" असं म्हटलं आहे.
advertisement
रिकाम्या बेसवर हल्ला - अमेरिकेनं केलं स्पष्ट
दरम्यान, इराणने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. इराणने कतारमध्ये ज्या बेसवर हल्ला केला, त्या ठिकाणी विमानं आणि इतर युद्ध सामग्री ही हटवण्यात आली होती, इराणने फक्त रिकाम्या विमानतळावर हल्ला केला आहे, असा खुलासा अमेरिकनं सरकारकडून करण्यात आला.
कतारमधील भारतीयांना सतर्क राहण्याचा इशारा
दरम्यान, कतारमध्ये अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली. भारत सरकारच्या वतीने तातडीने कतारमधील भारतीयांना आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय दुतावासाच्या संपर्कात राहावे, असं आवाहन भारत सरकारकडून करण्यात आलं आहे.
सीरियामध्ये अमेरिकन लष्करी तळावर हल्ला
दरम्यान, इराणवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीरियामध्ये अमेरिकन लष्करी तळावर हल्ला केलाा. सीरियाच्या पश्चिम हसाका प्रांतातील एका भागात असलेल्या अमेरिकन सैन्य अड्ड्याला लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे मिडल ईस्टमध्ये आणखी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. कारण अमेरिकेने आधीच स्पष्ट केलं होतं की, 'जर त्यांच्या लोकांना धोका पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, तर ती कडक उत्तर देईल.'
Mehrnews.com च्या रिपोर्टनुसार, या हल्ल्यात सध्या कोणत्याही जखमी किंवा मृत्यूची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र त्यामुळे तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणी मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे की, सीरियाच्या अल-हसका प्रांतातील अमेरिकन लष्करी तळावर इराण समर्थित गटांनी क्षेपणास्त्र हल्ला केला.