TRENDING:

Khamenei Last Order: जगाला धडकी भरली, मृत्यूच्या आधी खामेनेईंची शेवटची ऑर्डर; इराणचे सैन्य कोणाच्या बापाचे ऐकेना; लष्कर सरकारच्या हाताबाहेर गेले

Last Updated:

Israel Iran War: अमेरिका-इस्रायलविरुद्धच्या कारवायांचे नेतृत्व करणारे Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) सध्या स्वतंत्रपणे कार्य करत असल्याचा दावा इराणचे परराष्ट्रमंत्री Abbas Araghchi यांनी केला आहे. ओमानवरील हल्ला सरकारच्या थेट आदेशावर नव्हता, असे सांगत त्यांनी आखाती तणावात नवे राजकीय समीकरण उभे केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेहरान: अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचे नेतृत्व करणारे इराणचे एलिट दल Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) स्वतंत्रपणे कार्य करत असल्याचे इराणचे परराष्ट्रमंत्री म्हणाले आहेत. ओमानवरील हल्ला आमच्या परवानगीने नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले.
News18
News18
advertisement

IRGC ची स्थापना मे 1979 मध्ये इराणी क्रांतीनंतर Ruhollah Khomeini यांनी केली होती. हे दल पारंपरिक इराणी सैन्यापासून (Artesh) वेगळे आहे. BBC च्या अहवालानुसार 1979 मधील सत्ताबदलानंतर इराणच्या धर्मगुरूंनी नव्या राज्यघटनेत दोन स्वतंत्र सैन्यव्यवस्था निर्माण केल्या. एक नियमित लष्कर (Artesh), जे देशाच्या सीमांचे रक्षण आणि अंतर्गत सुव्यवस्था राखते आणि दुसरे रिव्होल्यूशनरी गार्ड (Pasdaran), जे इस्लामिक व्यवस्थेचे संरक्षण करते.

advertisement

IRGC थेट इराणच्या सर्वोच्च नेत्याला अहवाल देत असे. ही भूमिका Ayatollah Ali Khamenei यांच्याकडे होती. काल अमेरिका-इस्रायलच्या कारवाईत त्यांच्या हत्येनंतर IRGC सध्या नेतृत्वविहीन अवस्थेत असून स्वतंत्रपणे कार्य करत असल्याचे मानले जात आहे.

आमची निवड नव्हती

इराणचे परराष्ट्रमंत्री Abbas Araghchi यांनी Al Jazeera ला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक विधान केले. ओमानमधील बंदरावर झालेल्या हल्ल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ओमानमध्ये जे घडले, तो आमचा आदेश नव्हता. आम्ही आमच्या सशस्त्र दलांना लक्ष्य निवडताना काळजी घेण्याचे सांगितले आहे.

advertisement

ते पुढे म्हणाले प्रत्यक्षात आमची लष्करी युनिट्स आता काही प्रमाणात स्वतंत्र आणि अलिप्त अवस्थेत आहेत. त्यांना आधीच दिलेल्या सर्वसाधारण सूचनांच्या आधारे त्या कारवाई करत आहेत. या विधानाचे महत्त्व मोठे आहे. याचा अर्थ असा की IRGC सध्याच्या इराणी सरकारच्या थेट आदेशावर काम करत नसून, खामेनेई यांनी त्यांच्या हत्येपूर्वी दिलेल्या सूचनांनुसार कारवाई करत आहे.

advertisement

Associated Press च्या अहवालानुसार अराघची यांची ही विधाने आखाती शेजारी देशांशी तणाव कमी करण्याच्या प्रयत्नाचा भाग असू शकतात.

इराण का वेगळा आहे?

असोसिएटेड प्रेसनुसार जगभरातील सैन्यदल युद्धपरिस्थितीत केंद्र सरकारवर परिणाम झाल्यास काय करायचे याची पूर्वतयारी करत असतात. मात्र इराणचा संदर्भ वेगळा आहे, कारण IRGC कडे देशाचा विशाल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र साठा आणि बॉम्बवाहू ड्रोनचे नियंत्रण आहे.

advertisement

खामेनेई यांनी IRGC ला खाजगी उद्योगांमध्ये विस्तार करण्याचे अधिकारही दिले होते. बांधकाम कंपन्या, बंदरे, दूरसंचार नेटवर्क आणि लेसर डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केंद्रांपर्यंत IRGC चे जाळे पसरले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पुरेसे आर्थिक आणि प्रशासकीय साधनसामग्री आहे. पुढील सर्वोच्च नेता निवडला जाईपर्यंत IRGC वर थेट नियंत्रण ठेवणारा ‘बॉस’ नाही.

खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ IRGC ने घेतली आहे. त्यांच्या टेलिग्राम पेजवर त्यांनी लिहिले, उम्मतच्या इमामच्या हत्येचा कठोर आणि निर्णायक बदला घेणारा इराणी राष्ट्राचा हात गुन्हेगारांना सोडणार नाही. त्यांनी पुढे म्हटले की इराणी सैन्य त्यांच्या नेत्याच्या वारशाचे संरक्षण करत, अंतर्गत आणि बाह्य कटांविरुद्ध ठामपणे उभे राहील आणि आक्रमकांना ‘धडा शिकवणारी शिक्षा’ देईल.

सर्वसमावेशक लढाऊ दल

IRGC कडे अनेक विभाग आहेत. BBC च्या अहवालानुसार नियमित इराणी सैन्यापेक्षा सुमारे 2 लाखांनी कमी सैनिक असूनही IRGC ला देशातील सर्वात प्रभावी लष्करी शक्ती मानले जाते.

IRGC कडे स्वतःचे भूदल, वायुदल आणि नौदल आहे. त्याशिवाय ‘कुद्स फोर्स’ (Quds Force) नावाचे विशेष गुप्त कारवायांसाठीचे दल आहे. असोसिएटेड प्रेसनुसार कुद्स फोर्सने इस्रायल आणि अमेरिकेविरुद्धच्या तथाकथित Axis of Resistance उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष Bashar Assad, लेबनॉनमधील हिझ्बुल्ला संघटना, येमेनमधील हूथी बंडखोर आणि इतर प्रादेशिक गटांना पाठिंबा दिला. 2003 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इराकवरील आक्रमणानंतर या गटांची ताकद वाढली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
33 खंड प्रकाशित, संशोधकांसाठी संधी, डेक्कन कॉलेजमध्ये सर्वात मोठी संस्कृत डिक्शन
सर्व पहा

IRGC कडे स्वतःची गुप्तचर यंत्रणाही आहे. तसेच ‘बसीज’ (Basij) नावाचे स्वयंसेवी दल आहे. बसीज हे इराणच्या धर्माधिष्ठित व्यवस्थेचे अंतर्गत आंदोलन दडपण्यासाठीचे प्रमुख साधन मानले जाते. डिसेंबरमधील अलीकडील आंदोलनांदरम्यान बसीज सदस्यांकडे लांब पल्ल्याची बंदुके, लाठ्या आणि पेललेट गन दिसून आल्या होत्या. आंदोलकांना मारहाण करणे आणि पाठलाग करणे असे प्रकारही समोर आले होते.

मराठी बातम्या/विदेश/
Khamenei Last Order: जगाला धडकी भरली, मृत्यूच्या आधी खामेनेईंची शेवटची ऑर्डर; इराणचे सैन्य कोणाच्या बापाचे ऐकेना; लष्कर सरकारच्या हाताबाहेर गेले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल