TRENDING:

इराणकडून थरकाप उडवणारी धमकी, अमेरिकेत एकही नागरीक आज रात्री झोपणार नाही; 10 हजार सैनिकांविरुद्ध मोठी हालचाल

Last Updated:

इराणच्या 'तेहरान टाइम्स'ने अमेरिकन सैन्याला "Welcome To Hell" म्हणत थेट निर्वाणीचा इशारा दिला असून, इराणच्या भूमीवर पाऊल ठेवल्यास सैनिक केवळ शवपेटीतच परत जातील, अशी धमकी दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेहरान: इराणच्या इंग्रजी दैनिक तेहरान टाइम्सच्या पहिल्या पानावर आज Welcome To Hell या मथळ्याखाली अमेरिकेला थेट इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यात म्हटले आहे की, कोणतेही अमेरिकन सैनिक जर इराणच्या भूमीवर पाऊल ठेवतील, तर ते फक्त शवपेटीतच परत जातील हा इशारा अशा वेळी समोर आला आहे जेव्हा अमेरिकेने मध्यपूर्वेत आणखी 10,000 सैनिक तैनात करण्याचा विचार सुरू केल्याची बातमी समोर आली आहे.
News18
News18
advertisement

या संभाव्य हालचालीमुळे वॉशिंग्टन इराणमध्ये थेट लष्करी कारवाईची तयारी करत असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार इराणसोबत शांतता चर्चेचे संकेत दिले असतानाही ही संभाव्य तैनाती अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीत मोठी वाढ ठरू शकते.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार अतिरिक्त सैन्य पाठवण्यामागचा उद्देश ट्रम्प प्रशासनाला अधिक लष्करी पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. 28 फेब्रुवारीपासून अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यापासून मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच हजारो पॅराट्रूपर्स आणि मरीन सैनिक या भागात तैनात करण्यात आले असून नव्याने पाठवले जाणारे सैन्य त्यांच्यात सहभागी होईल.

advertisement

इराणच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट इशारा दिला आहे की अमेरिकेने जमिनीवरून आक्रमण केल्यास इराण आपल्या येमेनमधील हौथी मित्रांना सक्रिय करेल. हौथी गटाला रेड सी (लाल समुद्र) मध्ये जहाजांवर पुन्हा हल्ले सुरू करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात ज्यामुळे या संघर्षात एक नवीन आघाडी उघडू शकते.

advertisement

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मात्र सातत्याने सांगितले आहे की त्यांचा इराणविरोधात थेट जमिनीवरील लष्करी कारवाईत सैन्य पाठवण्याचा कोणताही हेतू नाही. अतिरिक्त अमेरिकन सैन्य नेमके कुठे तैनात केले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार हे सैन्य इराणच्या जवळ तसेच इराणच्या किनाऱ्याजवळील महत्त्वाच्या तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटाच्या आसपास तैनात केले जाऊ शकते.

advertisement

याचदरम्यान ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर पुढील हल्ल्यांसाठी ठरवलेली मुदत पुढे ढकलली आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चा खूप चांगल्या प्रकारे सुरू आहेत. पण प्रत्यक्ष युद्धभूमीवरही तणाव कायम आहे. इस्रायलच्या सैन्याने शुक्रवारी सकाळी तेहरानमधील इराणी दहशतवादी शासनाशी संबंधित पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याच दिवशी इस्रायलने बेरुतच्या दक्षिण उपनगरांवरही हल्ले पुन्हा सुरू केले ज्यात हिझबुल्लाशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

इराण समर्थित लेबनीज संघटना हिझबुल्लाने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्यासोबत थेट चकमक झाल्याचा दावा केला आहे.

मराठी बातम्या/विदेश/
इराणकडून थरकाप उडवणारी धमकी, अमेरिकेत एकही नागरीक आज रात्री झोपणार नाही; 10 हजार सैनिकांविरुद्ध मोठी हालचाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल