TRENDING:

Iran War: पुतीन यांनी ट्रम्प आणि नेतन्याहू यांचा 'प्लॅन' उधळला, इराण युद्धात कोणी विचारही केला नसेल ते घडलं!

Last Updated:

Iran War : इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामनेई यांची निवड केली. त्यांच्याही हत्येचे प्रयत्न झाले. या सगळ्या घडामोडी दरम्यान रशियाने खेळलेल्या एका डावामुळे अमेरिका-इस्रायलची झोप उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मॉस्को/तेहरान: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धाची तीव्रता आणखीच वाढत आहे. इराणविरोधात युद्ध पुकारल्यानंतर इस्रायल-अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुला खामनेईं यांची हत्या केली. त्यानंतर इराण कोलमडेल असा अंदाज होता. मात्र, इराणने आपला प्रतिकार अधिकच कडवा केला आहे. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामनेई यांची निवड केली. त्यांच्याही हत्येचे प्रयत्न झाले. या सगळ्या घडामोडी दरम्यान रशियाने खेळलेल्या एका डावामुळे अमेरिका-इस्रायलची झोप उडाली आहे.
पुतीन यांनी ट्रम्प आणि नेतन्याहू यांचा 'प्लॅन' उधळला, इराण युद्धात कोणी विचारही केला नसेल ते घडलं!
पुतीन यांनी ट्रम्प आणि नेतन्याहू यांचा 'प्लॅन' उधळला, इराण युद्धात कोणी विचारही केला नसेल ते घडलं!
advertisement

इराणचे नवनिर्वाचित सर्वोच्च नेते (सुप्रीम लीडर) मोजतबा खामनेई हे इराण सोडून रशियात आश्रयाला गेल्याचा खळबळजनक दावा कुवेतचे प्रसिद्ध वृत्तपत्र 'अल जरीदा'ने केला आहे. या वृत्ताने व्हाईट हाऊसपासून ते इस्रायलपर्यंत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पुतीन यांची 'सिक्रेट' एअरलिफ्ट मोहीम?

'अल जरीदा'च्या वृत्तानुसार, मोजतबा खामनेई यांना अत्यंत गुप्तरीत्या रशियन लष्करी विमानातून मॉस्कोला नेण्यात आले आहे. प्रकृती खालावल्यामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. इराणमध्ये सुरू असलेल्या भीषण बॉम्बफेकीमुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे अशक्य होते. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांना मॉस्कोमधील राष्ट्राध्यक्ष भवनातील (क्रॅमलिन) विशेष रुग्णालयात दाखल करण्याची ऑफर दिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, इराणच्या सुरक्षा यंत्रणांना मोजतबा यांचे लोकेशन लीक होण्याची भीती होती, म्हणूनच त्यांना रशियात हलवण्यात आले.

advertisement

ट्रम्प काय म्हणाले?

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, "मोजतबा खामनेई जिवंत आहेत की नाही, हे कोणालाच माहीत नाही. कोणीही त्यांना पाहिलेले नाही. मी तर असे ऐकले आहे की ते कदाचित आता या जगात नाहीत. जर ते जिवंत असतील, तर त्यांनी शहाणपणा दाखवून आत्मसमर्पण करावे." ट्रम्प यांच्या या विधानामुळे मोजतबा यांच्या मृत्यूच्या अफवांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

advertisement

युद्धाची दिशा बदलणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

इराणच्या अधिकृत सूत्रांनी मोजतबा सुरक्षित असल्याचे म्हटले असले, तरी त्यांना रशियात हलवल्याच्या वृत्ताने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रशियाने उघडपणे इराणच्या सर्वोच्च नेत्याला संरक्षण देणे, हा अमेरिकेसाठी मोठा इशारा मानला जात आहे. जर मोजतबा खरंच रशियात असतील, तर अमेरिका आणि इस्रायलच्या 'टार्गेट लिस्ट'मधील सर्वात महत्त्वाचे नाव आता पुतीन यांच्या संरक्षणात आहे, ज्यामुळे हे युद्ध अधिक गुंतागुंतीचे होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Iran War: पुतीन यांनी ट्रम्प आणि नेतन्याहू यांचा 'प्लॅन' उधळला, इराण युद्धात कोणी विचारही केला नसेल ते घडलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल