सीरियातील बंडखोरांनी आता राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला, राष्ट्रपती बशर अल-असद हे देश सोडून पळाले आणि त्यानंतर संघर्ष आणखी पेटला. रशियन मीडियानुसार असद यांना मॉस्कोमध्ये आश्रय देण्यात आला आहे. सीरियासाठी नवीन युग असल्याचं बंडखोरांनी लगेच जाहीर केलं. दरम्यान, असद हे पळून जाताच इस्रायलने सीरियावर बॉम्बहल्ला केला.
राष्ट्रपती अल-असाद यांच्या 24 वर्षांच्या राजवटीवर मोठा हल्ला. बंडखोरांनी हवेत गोळीबार करत आनंद साजरा केला. सध्या सीरियात प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे इस्रायलने संधीसाधूपणा करत सीरियावर हल्ला केला आहे. बंडखोरांनी राष्ट्रपतींच्या घराचा आणि कार्यालयाचा ताबा मिळवल्याचीही माहिती मिळाली आहे.
advertisement
सीरियन मीडियाने रविवारी (8 डिसेंबर) दक्षिण सीरियातील दरारा आणि सुवायदा भागात अनेक इस्रायली हवाई हल्ले केले. सीरिया-इस्रायल सीमेजवळ आणि राजधानी दमास्कसजवळील मेझेह हवाई तळावरही हल्ले करण्यात आले. बशर अल-असद देश सोडून पळून गेल्याची बातमी रविवारी सकाळी येताच नेतान्याहू यांनी तातडीची बैठक बोलावली. सीरियाच्या सीमेवरील बफर झोन ताब्यात घेण्याचे आदेश आयडीएफला तातडीने दिले. यानंतर आयडीएफने सीरियाच्या हद्दीत प्रवेश केला. इस्रायल सीरियावर सतत बॉम्बहल्ला करत आहे.
