एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यानं रॉयटर्स न्यूज एजन्सीला सांगितले होते की, आतापर्यंत इराणींनी एकाही अमेरिकन व्यक्तीला मारलेले नाही, त्यामुळे अमेरिका इराणच्या राजकीय नेतृत्वालाही लक्ष्य करणार नाही. त्यानंतर फॉक्स न्यूजशी बोलताना इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणमध्ये सत्ता बदल होण्याची शक्यताही वर्तवली. इस्रायलने इराणच्या खमेनींना सद्दामसारखे नशिब देण्याची धमकी दिली, तेहरानवर 'महत्त्वपूर्ण' हल्ल्यांचा इशारा दिला.
advertisement
युद्ध आणखी हिंसक आणि उग्र स्वरुप धारण करण्याची शक्यता
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरु असणारं युद्ध आता आणखी हिंसक आणि उग्र स्वरुप धारण करण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची राजधानी असलेलं तेहरान शहर खाली करा, असा इशारा नागरिकांना दिला आहे. इराणची राजधानी असलेलं तेहरान शहर रिकामी करण्याची गरज आहे. अणु करारावर स्वाक्षरी न करण्याचा इराणचा निर्णय मूर्खपणाचा आहे. इराणनं या करारावर स्वाक्षरी केली पाहिजे होती. अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केलीय. इराणकडे अणवस्त्रं असता कामा नयेत,असं ट्रम्प म्हणालेत.
भारतीय नागरिकांनाही तेहरान सोडण्याचा सल्ला
सुरक्षेच्या कारणास्तव इराणची राजधानी तेहरानमधील भारतीय दूतावासाने तेथे उपस्थित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. याव्यतिरिक्त, परिस्थिती लक्षात घेता स्वतःहून प्रवास करू शकणाऱ्या भारतीय नागरिकांनाही तेहरान सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अर्मेनिया सीमेवरून देश सोडण्यास मदत
दरम्यान, काही भारतीय नागरिकांना इराण-आहे आणि सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्मेनिया सीमेवरून देश सोडण्यास मदत करण्यात आली आहे. भारतीय दूतावास सतत भारतीय समुदायाच्या संपर्कात असून परिस्थिती बदलत असताना, अधिक सूचना जारी केल्या जाऊ शकतात असेही दूतावासाने म्हटले आहे.
