TRENDING:

1 हजार किलो रंग अन् 150 सदस्य, सिद्धेश्वर यात्रेनिमित्त साकारली भव्य रांगोळी, Video  

Last Updated:

संस्कार भारतीची मागील 28 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. यंदा मतदानाचा अधिकार ही मुख्य संकल्पना या रांगोळ्यांमध्ये दिसून आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण ठरत आहे, ते म्हणजे विविध संदेश देणाऱ्या रांगोळ्या. संस्कार भारतीची मागील 28 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. यंदा मतदानाचा अधिकार ही मुख्य संकल्पना या रांगोळ्यांमध्ये दिसून आली आहे. या संदर्भात अधिक माहिती संस्कार भारतीचे सचिव अनंत देशपांडे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement

गेल्या 28 वर्षांपासून संस्कार भारतीच्या वतीने सकाळी सहा वाजल्यापासून हिरेहब्बू वाड्यापासून ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत रांगोळी काढण्यात येते. जवळपास 3 किलोमीटरपर्यंत ही रांगोळी काढण्यात येते. साधारणतः संस्कार भारतीचे 150 हून अधिक सदस्य या रांगोळी साकारण्यासाठी मेहनत घेत असतात. या रांगोळ्या साकारण्यासाठी जवळपास 1 हजार किलो रंग आणि 50 पोते रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. ही रांगोळी काढण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह पुणे, तुळजापूर, कोल्हापूर, या ठिकाणाहून तरुण-तरुणी आले आहेत.

advertisement

संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात? भोगीच्या भाजीची परंपरा काय? Video

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक सणाला गोड जोड, पुण्यात मिळतंय चक्क तिळगुळ चॉकलेट, हे आहे लोकेशन
सर्व पहा

संस्कार भारतीच्या वतीने काढण्यात आलेल्या रांगोळीच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाच्या वर्षी मतदानाचा हक्क बजावणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, शिक्षणाचे महत्त्व आदी संदेश देण्याचा प्रयत्न या रांगोळीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
1 हजार किलो रंग अन् 150 सदस्य, सिद्धेश्वर यात्रेनिमित्त साकारली भव्य रांगोळी, Video  
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल