TRENDING:

Jeddah Road accident: सौदी अरेबियातील भीषण अपघातात 9 भारतीयांचा मृत्यू

Last Updated:

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही या घटनेवरुन दुःख व्यक्त केलं आहे. तसेच पीडित कुटुंबांना मदत करण्यास तयार असल्याचे म्हटलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : सौदी अरेबियात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सौदीत झालेल्या रस्ते अपघातात नऊ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारतीय दुतावासाने या अपघाताची माहिती दिली आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटलं आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात हा अपघात झाला आहे.
News18
News18
advertisement

या अपघातासंदर्भात भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, जेद्दाहच्या पश्चिम भागाजवळ एका रस्ते अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत पीडित असलेल्या कुटुंबांच्या संपर्कात आहेत आणि शक्य ते सर्व मदत करत आहेत. जेद्दाह हे इस्लामचे पवित्र शहर असलेल्या मक्काचे मुख्य प्रवेशद्वार आहे

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही या घटनेवरुन दुःख व्यक्त केलं आहे. तसेच पीडित कुटुंबांना मदत करण्यास तयार असल्याचे म्हटलं आहे. जयशंकर म्हणाले, या दुर्घटनेबद्दल आणि जीवितहानीबद्दल झाल्याचे ऐकून दुःख झाले. जेद्दाहमधील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो. ते पीडित कुटुंबांच्या संपर्कात आहेत. तसेच या दुःखद परिस्थितीत शक्य ती सर्व मदत करत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडील जिझानजवळ झालेल्या रस्ते अपघातात  भारतीय नागरिकांच्या दुर्दैवी मृत्युबद्दल आम्हाला तीव्र दुःख आहे. जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावास पूर्ण मदत करत असून आणि अधिकारी आणि कुटुंबियांच्या संपर्कात आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींनी लवकर बरे व्हावे अशी आम्ही प्रार्थना करतो. मदतीसाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Jeddah Road accident: सौदी अरेबियातील भीषण अपघातात 9 भारतीयांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल