अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी राजधानी ब्राझिलियातील एकाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याचं सांगितलं. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. ब्राझीलच्या लेफ्टनंट गव्हर्नरननी सांगितलं की, संशयिताने आधी संसदेच्या पार्किंगमधील एका कारमध्ये स्फोटकं लावली होती. पण यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. स्पीकर ऑर्थर लिरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिओ यांनी कोणताही धोका होऊ नये यासाठी गुरुवारी संसद बंद ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार गुरुवारी दुपारपर्यंत सदन बंद ठेवण्यात आलं होतं.
advertisement
ब्राझिलियातील थ्री पॉवर्स प्लाझामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर २० सेकंदाच्या अंतराने स्फोट झाले. या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, संसद आणि राष्ट्रपती भवनासह ब्राझीलच्या मुख्य सरकारी इमारती आहेत. घटनेनंतर बराच वेळ या परिसरात गोंधळ होता.
काही दिवसांपूर्वी ब्राझीलच्या मैसियो इथं रहिवाशी इमारतीत स्फोट झाला होता. यात १० वर्षीय मुलासह तिघांचा मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी झाले होते. अग्निशमन विभागाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. नागरिक सुरक्षा प्रवक्ते म्हणाले की, प्राथमिक तपासात अशी माहिती मिळाली की स्फोटाचे कारण एका अपार्टमेंटमध्ये सिस्टिममधून गॅस लीक हे होते. स्फोटानंतर लागलेल्या आगीत २ मजली इमारत जळून खाक झाली.
