TRENDING:

तेहरानकडून 'कच्चा' माल तयार, संपूर्ण जगभरात खळबळ; इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोका- अमेरिका, युरोप हादरले

Last Updated:

Iran Nuclear Weapons: IAEA च्या गुप्त अहवालानं खळबळ उडवली आहे. ईराणकडे आता 60% समृद्ध यूरेनियमचा साठा असून तो थेट अणुबॉम्बनिर्मितीच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिका, युरोप आणि इस्रायलमध्ये एकाच वेळी अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेहरान: इराणमधून आलेल्या एका गोपनीय अहवालामुळे पुन्हा एकदा संपूर्ण जगभरात चिंता आणि खळबळ निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षण संस्थेने (IAEA - इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी एजन्सी) दिलेल्या माहितीनुसार, इराणने अण्वस्त्र बनवण्यासाठी वापरता येणाऱ्या यूरेनियमचा साठा आणखी वाढवला आहे.
News18
News18
advertisement

ही माहिती IAEA च्या एका गोपनीय अहवालातून समोर आली असून, या साठ्यात असलेला यूरेनियम जवळपास 60% शुद्धतेचा आहे. अण्वस्त्र बनवण्यासाठी लागणाऱ्या यूरेनियमची शुद्धता साधारणतः 90% असते. त्यामुळे 60% शुद्धतेचा यूरेनियम हा ‘हथियार-ग्रेड’ यूरेनियमच्या अत्यंत जवळचा मानला जातो. त्यामुळे केवळ थोडक्याच प्रक्रियेनंतर या यूरेनियमचा वापर अण्वस्त्र निर्मितीसाठी होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

advertisement

या अहवालानंतर अमेरिका, युरोप आणि विशेषतः मध्य-पूर्वेत मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये असेही नमूद आहे की इराण लवकरच क्षेपणास्त्र चाचणी करण्याच्या तयारीत असून, त्याने आपल्या हवाई हद्द देखील बंद केल्या आहेत. यामुळे जागतिक पातळीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्पा मालकीणचा खतरनाक सूड, टोळीसह कर्मचाऱ्यासोबत केलं भयानक;..अन् पेटवण्याची धमकी

advertisement

IAEA ने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, इराणने ही प्रक्रिया तातडीने थांबवावी. संस्थेने तक्रार केली आहे की इराण वेळोवेळी तपासणी यंत्रणांवर निर्बंध घालतो आहे आणि निरीक्षणासाठी आवश्यक असलेली उपकरणे वापरण्याची परवानगी नाकारत आहे. त्यामुळे इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत पारदर्शकता राहिलेली नाही.

इराण ने मात्र आपल्या बाजूने स्पष्ट केले आहे की, त्यांचा अणु कार्यक्रम फक्त ऊर्जा निर्मिती आणि वैद्यकीय उपयोगासाठी आहे. अण्वस्त्र बनवण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे ते वेळोवेळी सांगत आले आहेत.

advertisement

चीनने दिला मोठा इशारा, भारताच्या बॉर्डरपासून दूर रहा; जीवावर बेतू शकतं, BSF...

दरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे की, जर इराणने आपला अणु कार्यक्रम पूर्णपणे स्पष्ट केला नाही. तर त्यांच्यावर अधिक कठोर आंतरराष्ट्रीय निर्बंध लावले जातील.इस्रायलने तर याला थेट आपल्या अस्तित्वासाठी धोका असल्याचे म्हटले असून, लष्करी कारवाईच्या पर्यायाचाही उल्लेख केला आहे.

advertisement

यूरेनियम आणि त्याचा उपयोग काय?

यूरेनियम हा एक नैसर्गिक खनिज घटक आहे. जो अणुशक्ती प्रकल्पांमध्ये व अण्वस्त्रांमध्ये वापरला जातो. सामान्यतः वीज निर्मितीसाठी 3% ते 5% समृद्ध यूरेनियम पुरेसा असतो. परंतु अण्वस्त्रासाठी त्याची समृद्धता सुमारे 90% असावी लागते. 60% शुद्धतेचा यूरेनियम हा अर्धवट प्रक्रिया पूर्ण केलेला मानला जातो आणि त्यामधून थोड्याच वेळात आणि थोड्या प्रयत्नांत अण्वस्त्र बनवता येते.

रशियाने मोठा डाव टाकला, चीनला सोबत घेऊन सुरू आहे खतरनाक गेमप्लान; भारताला...

धोका किती मोठा आहे?

IAEA च्या मते 60% समृद्ध यूरेनियम हा अती चिंतेचा विषय आहे. कारण त्यामधून केवळ काही आठवड्यांमध्ये अण्वस्त्र बनवले जाऊ शकते. जर इराणने आपला हेतू बदलून अण्वस्त्रनिर्मितीकडे वळवला तर त्यांना तो कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. याचा थेट परिणाम प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेवर होऊ शकतो.

इराण खरंच अणुबॉम्ब बनवणार आहे का?

इराणने वारंवार सांगितले आहे की त्यांचा अणु कार्यक्रम पूर्णपणे शांतता आणि औषधनिर्मिती तसेच उर्जेसाठीच आहे. पण जगातील अनेक पाश्चात्त्य देश आणि संरक्षण विश्लेषक यावर विश्वास ठेवत नाहीत. कारण इराणकडून IAEA च्या निरीक्षणाला वेळोवेळी विरोध केला गेला आहे.

जर इराण अण्वस्त्र बनवण्यात यशस्वी झाला, तर केवळ मध्य-पूर्वच नाही, तर संपूर्ण जगासाठी ही एक मोठी आणि गंभीर सुरक्षा समस्या ठरेल. यामुळे या भागात अण्वस्त्र शर्यतीला चालना मिळू शकते आणि इतर देशही याच मार्गावर जाण्याचा विचार करू शकतात.

मराठी बातम्या/विदेश/
तेहरानकडून 'कच्चा' माल तयार, संपूर्ण जगभरात खळबळ; इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोका- अमेरिका, युरोप हादरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल