CCTV Footage: स्पा मालकीणचा खतरनाक सूड, टोळीसह कर्मचाऱ्यासोबत केलं भयानक; सिगारेट, शिव्या अन् पेटवण्याची धमकी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Crime News: स्पा व्यवसायातून बाहेर पडून स्वतःचा सलून सुरू करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. महिला मालकीणने टोळी सोबत त्याच्यावर भयंकर हल्ला करत अपहरण, मारहाण आणि पेटवण्याची धमकी दिली.
बेंगळुरू: व्यवसायातील वैरामुळे एका महिलेनं टोळी तयार करून गुरुवारी एका पुरुषावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला. पोलिसांच्या माहितीनुसार पीडित व्यक्तीने या महिलेच्या मालकीच्या सलूनमधील नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता.
या प्रकरणात पोलिसांनी निशा ऊर्फ स्मिता, काव्या आणि मोहम्मद यांना अटक केली आहे. यापैकी काव्या आणि मोहम्मद यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं असून निशा न्यायालयीन कोठडीत आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
मला जन्नत मिळेल, म्हणत केला आईवडिलांचा खून; इंजिनिअर मुलाच्या राक्षसी कृत्यांची
संजू पी. बी. (वय 40), भूवनेश्वरिनगर मेन रोडवरील ‘रॉयल चॉइस सलून अँड स्पा’चे मालक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार- स्मिता (येलहंकामधील एका स्पाची मालक) हिने काव्या, मोहम्मद आणि अन्य दोन जणांसह रात्री 8 च्या सुमारास त्यांच्या स्पामध्ये घुसून हल्ला केला. काव्याने त्यांच्या कॉलरला धरून मारहाण केली आणि मोहम्मद व इतर दोन जणांनीही त्यांच्यावर हल्ला केला.
advertisement
Meet Lady Don Nisha from Bengluru who along with her gang members Kavya and Mohammed kidnapped a Man who was earlier working in her spa and doused him with petrol and threatened to set him alive on fire in the Amruthahalli area of the city.pic.twitter.com/ufjFnJSkGZ
— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) May 31, 2025
advertisement
त्यांना कारमध्ये ओढून नेलं गेलं आणि दसरहळ्ली व जक्कूर भागात फिरवलं गेलं. संपूर्ण प्रवासादरम्यान संजू यांना मारहाण केली आणि अपशब्द वापरण्यात आले. जक्कूरमध्ये रस्त्याच्या कडेला कार थांबवून टोळीने बीयरच्या बाटलीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. स्मिताने त्यांना पेटवून देण्याची धमकी दिली.
घरात केला होता पैशांचा डोंगर, छापा पडताच खिडकीतून फेकल्या नोटा; कोटींचा थरार
या हल्ल्यावेळी संजू यांच्या पत्नी स्पामध्ये उपस्थित होत्या. त्यांनी अमृतहल्ली पोलिस ठाण्यात जाऊन मदतीची मागणी केली. पोलिसांनी स्मिताला फोन करून इशारा दिल्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास संजू यांना अमृतनगर परिसरात सोडून देण्यात आलं.
advertisement
संजू यांनी पोलिसांना दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला सिगारेट ओढत त्यांना मारहाण करत असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात BNS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजू हे पूर्वी स्मिताच्या सहकारनगर येथील स्पामध्ये काम करत होते. मात्र आठ महिन्यांपूर्वी स्मिताने तिचा स्पा बंद केला आणि अलीकडे येलहंकामध्ये नवीन स्पा सुरू केला. दरम्यान संजू यांनी तिच्याकडून नोकरी सोडून स्वतःचा स्पा सुरू केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 31, 2025 5:16 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
CCTV Footage: स्पा मालकीणचा खतरनाक सूड, टोळीसह कर्मचाऱ्यासोबत केलं भयानक; सिगारेट, शिव्या अन् पेटवण्याची धमकी