घरात तयार केला होता पैशांचा डोंगर, छापा पडताच खिडकीतून फेकल्या नोटा; कोटींच्या बंडलचा थरार

Last Updated:

Raids: भुवनेश्वरमध्ये ओडिशा सरकारच्या मुख्य अभियंत्याच्या घरावर धाड टाकली आणि उघडकीस आला कोट्यवधी रुपयांचा काळाबाजार. खिडकीतून नोटा फेकण्याचा प्रयत्न करताना अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

News18
News18
भुवनेश्वर: ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये गुरुवारी सकाळी मोठी खळबळ माजली. राज्य सरकारचे मुख्य अभियंता बैकुंठ नाथ सारंगी यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी एकाचवेळी Vigilance विभागाने धाड टाकली. या कारवाईदरम्यान तब्बल 2.1 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सारंगी यांच्या जाहीर संपत्ती आणि त्यांच्या उत्पन्नात दिसून आलेल्या संशयास्पद फरकाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली.
खिडकीतून नोटांचे बंडल फेकत होते 
या प्रकरणातील सर्वात नाट्यमय क्षण तेव्हा समोर आला जेव्हा सतर्कता विभागाचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. सारंगी यांनी घाबरून आपल्या फ्लॅटच्या खिडकीतून रोख रक्कमेची बंडल खाली फेकण्याचा प्रयत्न केला. ही कृती पाहून अधिकारी अधिक सतर्क झाले आणि संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली. स्थानिकांनी सांगितले की, जमीनवर पडलेल्या नोटांचे बंडल गोळा करून ते बॅगमध्ये भरले गेले.
advertisement
धक्कादायक खुलासे
Vigilance विभागाने दिलेल्या माहितीनुसार भुवनेश्वर, कटक, पुरी आणि बालासोर या शहरांतील सात ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या दरम्यान पुढील संपत्ती सापडली:
-2.1 कोटींची रोख रक्कम
-महागडे इलेक्ट्रॉनिक साहित्य व आलिशान फर्निचर
advertisement
-मौल्यवान दागदागिने
-जमिनी व फ्लॅटचे दस्तऐवज
-अनेक बँक खाती आणि लॉकरची माहिती
-50 हून अधिक अधिकाऱ्यांची कारवाईत सहभाग
25 हजार लोकांना ठार केले, हजारो लोक बेपत्ता; मोदीजी, Please मदत करा
या संपूर्ण ऑपरेशनसाठी Vigilance विभागाच्या 7 टीम्स कार्यरत होत्या. यामध्ये एकूण 50 हून अधिक अधिकारी सहभागी होते. विशेष तपासासाठी 26 पोलिस अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली होती. यामध्ये 8 डीएसपी, 12 निरीक्षक, 6 सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) आणि अन्य सहाय्यक कर्मचारी सहभागी होते.
advertisement
अटक नाही
Vigilance विभाग आता या सापडलेल्या रोख रकमेच्या वैधतेची तपासणी करत आहे. सारंगी यांच्याविरुद्ध अवैध संपत्ती संचय, भ्रष्टाचार आणि शासकीय साधनसंपत्तीचा गैरवापर यासंबंधी तपास सुरू करण्यात आला आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. परंतु त्यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला असून तपासासाठी समन्स पाठवण्यात आला आहे.
advertisement
या घटनेमुळे ओडिशातील प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एक शासकीय अभियंता इतकी प्रचंड रक्कम रोख स्वरूपात कशी साठवतो हा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रकार वैयक्तिक भ्रष्टाचार आहे की एखाद्या संघटित टोळीशी संबंधित आर्थिक गुन्हा याबाबत सखोल तपास अपेक्षित आहे.
यापूर्वीदेखील ओडिशामधील PWD, ग्रामीण विकास, व जलसंपत्ती विभागातील अभियंत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. मात्र खिडकीतून रोख रक्कम फेकण्याचा प्रकार सार्वजनिक चर्चेचा विशेष विषय ठरला आहे.
advertisement
या कारवाईमुळे राज्य सरकारवरील दबाव वाढला असून अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी होऊ लागली आहे. पुढील तपासात या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/Viral/
घरात तयार केला होता पैशांचा डोंगर, छापा पडताच खिडकीतून फेकल्या नोटा; कोटींच्या बंडलचा थरार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement