मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार म्यानमार भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे बँकॉकमध्ये इमारत कोसळली. नमारमध्ये आज तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकेची भूगर्भ सर्वेक्षण संस्था (USGS) ने सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 इतकी नोंदवली होती. मात्र, भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (National Center for Seismology) नंतर सुधारित माहिती देत भूकंपाची तीव्रता 7.0 सांगितली. हा शक्तिशाली भूकंप भारताच्या शेजारील देश म्यानमारमधील सागाइंग प्रांतात झाला. भूकंपाची खोली जमिनीपासून १० किलोमीटर खाली होती. USGS ने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:50 (भारतीय वेळेनुसार सकाळी 11:20) च्या सुमारास सागाइंग शहराच्या 16 किलोमीटर वायव्येला 10 किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
advertisement
दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्ये देखील भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. या भागात तीव्रता कमी होती. मात्र यामुळे नोएडा आणि गाझियाबादमध्ये भीतीचं वातावरण आहे. फक्त म्यानमारच नाही, तर थायलंडची राजधानी बँकॉक येथेही भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. त्यामुळे लोक घाबरून कार्यालये आणि दुकाने सोडून रस्त्यावर आले.
वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या नैऋत्येकडील युन्नान भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. बँकॉक शहरातील लोकांनी सांगितले की लोक खूप घाबरले होते आणि इमारतींमधून बाहेर पडले, तसेच अनेक स्विमिंग पूल मधून पाणी बाहेर पडायला लागले.बँकॉकमध्ये भूकंपाचा जोर इतका जास्त होता की लोक भीतीने थरथर कापत होते. उंच इमारती आणि कार्यालयांमधून लोक सुरक्षिततेसाठी बाहेर धावले. बँकॉक हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे.
भूकंप इतका शक्तिशाली होता की उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांवरील स्विमिंग पूल तसेच इतर ठिकाणच्या पूलमधून पाणी बाहेर आले. भूकंपाच्या वेळी इमारती जोरदारपणे हलत होत्या, त्यामुळे अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य म्यानमारमध्ये, मोनीवा शहराच्या पूर्वेला सुमारे ५० किलोमीटर (३० मैल) अंतरावर होता.
आता प्रश्न येतो की भूकंप का येतात?
भूकंप वैज्ञानिकांच्या मते, आपली पृथ्वीची पृष्ठभाग मुख्यत्वे सात मोठ्या आणि अनेक लहान टेक्टोनिक प्लेट्सनी बनलेली आहे. या प्लेट्स सतत हालचाल करत असतात आणि बऱ्याचदा एकमेकांवर आदळतात. या टक्करीमुळे प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जास्त दाब आल्यामुळे त्या तुटतात सुद्धा. अशा स्थितीत, खाली तयार झालेली ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि हीच ऊर्जा जेव्हा जमिनीतून बाहेर येते, तेव्हा भूकंप येतो.
