TRENDING:

नासाच्या एका चुकीमुळे मंगळावरचं जीवन झालं नष्ट; जर्मन संशोधकाचा मोठा दावा

Last Updated:

नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी 1975 मध्ये वायकिंग मोहीम सुरू केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पृथ्वीव्यतिरिक्त अन्य कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का, यावर सातत्याने संशोधन केले जात आहे. गेल्या काही दशकांपासून संशोधक या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर एका अ‍ॅस्ट्रोबायोलिस्टने नासाच्या एका मोहिमेवर शंका उपस्थित केली आहे. नासाने मंगळ मोहिमेमध्ये नकळत एक चूक केली आणि तिथली जीवसृष्टीची शक्यता नष्ट झाली, असं या शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे.
फाईल फोटो
फाईल फोटो
advertisement

पृथ्वीव्यतिरिक्त अन्य कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध संशोधक गेल्या कित्येक दशकांपासून घेत आहेत. हवामानबदलामुळे पृथ्वीवर नैसर्गिक संकटं वाढत असताना पृथ्वीव्यतिरिक्त इतर ग्रहांवर जीवसृष्टीचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीतल्या बर्लिनमधल्या टेक्निक विद्यापीठातले अ‍ॅस्ट्रोबायोलॉजिस्ट डिर्क शुल्ज माकुच यांनी नासाच्या पाच दशकांपूर्वी झालेल्या एका मोहिमेबाबत मोठा दावा केला आहे. 70च्या दशकात मंगळावर पाठवलेल्या वायकिंग मिशनमध्ये नासाने अनवधानाने जीवसृष्टीची शक्यता नष्ट केली होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

advertisement

नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी 1975 मध्ये वायकिंग मोहीम सुरू केली. नासाने या ग्रहाच्या पृष्ठभागावर दोन अंतराळयानं पाठवली. नासाचं वायकिंग -1 हे मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणारं पहिलं यान होतं. 19 जून 1976 रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचलं. सुमारे महिनाभर प्रदक्षिणा केल्यावर ते मंगळावरच्या क्लायस प्लानिटिया या प्रदेशात उतरले. काही महिन्यांनंतर नासाने वायकिंग -2 मोहीम सुरू केली. त्याने मंगळाच्या पृष्ठभागाची हाय रिझोल्यूशन छायाचित्रं पृथ्वीवर पाठवली. या चित्रांनी जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

advertisement

वायकिंग मोहिमेमध्ये नासाने मंगळावरच्या मातीत पाणी आणि पोषक घटकांचं मिश्रण करून तिची चाचणी केली. नासाने पृथ्वीवर जीवनासाठी आवश्यक असलेल्या गरजांची कल्पना करून या घटकांचं एकत्रित परीक्षण केलं. या परीक्षणाच्या सुरुवातीच्या निष्कर्षात मंगळावर जीवसृष्टी असल्याची शक्यता दिसली; पण या चाचणीचे निकाल चुकीचे होते, असं संशोधकांना आता वाटत आहे.

आता शुल्ज माकुच यांनी एक मूलगामी सिद्धांत मांडला आहे. त्यानुसार वायकिंग लँडर्सने मंगळावर जीवसृष्टीचा शोध लावला असेल; पण त्यांनी अनवधानाने मातीत पाणी मिसळून तिथल्या जीवनाची शक्यता नाहीशी केली.

advertisement

नेचरसाठी केलेल्या एका समालोचनात शुल्ज माकुच लिहितात, की मंगळ ग्रहावरचे जीव वातावरणातील आर्द्रता शोषून घेण्यासाठी मिठावर अवलंबून राहतात आणि कोरड्या वातावरणात ते सहज जिवंत राहू शकतात. ही स्थिती चिलीतल्या अटाकामा वाळवंटातल्या उच्च वातावरणात आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांसारखी आहे. तिथे मुसळधार पाऊस झाल्यानंतर तिथले 70-80 टक्के सूक्ष्मजीव नष्ट झाले. कारण, ते पाण्याशी जुळवून घेऊ शकले नाहीत. ते उदाहरण देऊन शुल्ज यांनी स्पष्ट केलं, की नासाच्या वायकिंग लँडरने कदाचित चुकून जास्त पाणी मिसळून मंगळावरच्या जीवसृष्टीची शक्यता संपुष्टात आणली आहे.

advertisement

शुल्ज माकुच यांनी सांगितलं, की पाण्याच्या द्रव स्वरूपाला प्राधान्य देण्याऐवजी भविष्यातल्या मोहिमांनी हायग्रोस्कोपिक लवणांचं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. हायग्रोस्कोपिक मीठ हा एक घटक असून, तो वातावरणातली आर्द्रता शोषून घेतो. मंगळावर आढळणारं मुख्य मीठ हे सोडियम क्लोराइड असून, ते सूक्ष्मजीवांचं जीवन अबाधित राखू शकतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

वायकिंग मोहिमेला जवळपास 50 वर्षं झाल्यानंतर शुल्ज माकुच यांनी मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नवीन प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. यात ग्रहाच्या पर्यावरणाविषयी नवीन माहिती आणि प्रयत्न समाविष्ट असावेत. आता आणखी एक जीवसृष्टी शोधण्यासाठी मोहीम आखण्याची वेळ आलेली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. आपला निष्कर्ष अजूनही अनुमानावर आधारित आहे. हा विश्वासार्ह पुरावा ठरावा यासाठी जीवसृष्टी शोधण्यासाठी नवीन स्वतंत्र पद्धत वापरणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या/विदेश/
नासाच्या एका चुकीमुळे मंगळावरचं जीवन झालं नष्ट; जर्मन संशोधकाचा मोठा दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल