ही आग रविवारी पहाटे ३ वाजता (स्थानिक वेळेनुसार) ‘पल्स क्लब’मध्ये लागली. यावेळी प्रसिद्ध हिप-हॉप जोडी ADN आपली संगीत प्रस्तुती सादर करत होती. आग इतकी भयानक होती की काही तासांपर्यंत संपूर्ण क्लब आगीच्या विळख्यात होता.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांच्या माहितीनुसार, कार्यक्रमादरम्यान वापरण्यात आलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टेजवरून उसळलेल्या ठिणग्यांनी छताला आग लागली आणि काही क्षणांत संपूर्ण क्लब आगीत वेढला गेला.
advertisement
या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने कोचानी आणि ३० किमी दक्षिणेला असलेल्या स्तिप येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सध्या अधिकृत आकडेवारी आणि अधिक तपशील उत्तर मॅसेडोनियाच्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, घटनास्थळी बचावकार्य जोरात सुरू असून प्रशासनाने या आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
