डॉन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, अहमदी शमा स्टेशन हाऊसचे ऑफिसर कलीम शाह यांनी सांगितले की, तीन महिलांसह 50 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनीही हाच आकडा सांगितला आहे.
आम्ही प्रशासनाशी संपर्कात असून बचावकार्य सुरू आहे.
राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी हल्ल्याचा निषेध केला
अलिझाईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुहम्मद इशाक यांनी सांगितले की, हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्ह्यातील विविध रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर काहींना पेशावरला देखील पाठवण्यात येत आहे. केपीचे मुख्य सचिव नदीम अस्लम चौधरी यांनी रॉयटर्सला सांगितले की, "मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे." राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2024 7:07 PM IST
