पाकिस्तानी अँकर भडकली
युद्धामुळे पाकिस्तान सुपर लीगवर का परिणाम होतोय? भारताची आयपीएल दुबईमध्ये खेळवली जाणार आहे का? नाही जात ना, मग तुमची पीएसएल दुबईत का खेळवली जाणार? असा रोखठोक सवाल पाकिस्तानच्या महिला अँकरने स्टुडिओमधील गेस्टला विचारला. तुम्हाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये फायनांशियल लॉस कुणामुळे झाला? गेल्या 10 वर्षांपासून कुणी तुमचं क्रिकेट थांबवलं... भारताने... भारत तुम्हाला वारंवार चिथावणी देत आहे. कधीपर्यंत तुम्ही पाकिस्तानच्या भावनांशी खेळणार? पीएसएल त्यांच्या एका ड्रोनमुळे हलवण्यात आलं, असं म्हणत पाकिस्तानच्या अँकरने प्रश्नाचा भडिमार केला.
advertisement
दोन अँकरमध्ये शाब्दिक वॉर
अँकरचा संताप पाहून उपस्थित असलेल्या दुसऱ्या अँकरने रोखण्याचा प्रयत्न केला आणि भारतात पण लाईट्स डीम करावल्या लागल्या, असं अँकरने म्हटलं. त्यावेळी मजेशीर घटना घडली. महिला अँकरच्या वक्तव्याने स्टुडिओमधील अँकरनेच खणखणीत उत्तर दिलं.
पाहा Video
महिला अँकर क्लीन बोल्ड
जोपर्यंत आयपीएल भारताच्या बाहेर जात नाही तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही, असं पाकिस्तानची महिला अँकर म्हणताना दिसतीये. त्यावर लगेच पाकिस्तानच्या दुसऱ्या अँकरने गुगली टाकली अन् तुमच्या समाधानासाठी कुठं युद्ध लढलं जाईल, असं खणखणीत उत्तर दिलं. त्यावर महिला अँकर क्लीन बोल्ड झाली. ही संपूर्ण पाकिस्तानच्या समाधानाची बाब आहे, असं म्हणत अँकरने प्रश्नाला बगल दिली.
