नेमकं काय झालं?
काश्मीर हा मुद्दा तर आहे, असं पाकिस्तानी अँकर म्हणताना दिसतोय. त्यावर जम्मू आणि काश्मीरमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या याना मीर यांनी रोखठोक उत्तर दिलं. जगात फक्त काश्मीर हाच एक मोठा मुद्दा होता का? इतर विषय देखील होते पण हा विषय सोडवला का गेला नाही? असा प्रश्न पाकिस्तानचा अँकर फकर युसुफझाई याने विचारला. त्यावर याना मीर यांनी मजेशीर उत्तर दिलं अन् पाकिस्तानी अँकरची बोलती बंद केली.
advertisement
याना मीर यांचं खणखणीत उत्तर
तुम्ही आंतरराष्ट्रीय फोरमवर जाऊन म्हणणार की, ती (काश्मीर) तिच्या नवऱ्यासोबत (भारत) खूश नाहीये. पण जेव्हा ती म्हणत असेल की, मी माझ्या नवऱ्यासोबत खूश आहे. परंतू तुम्ही परत आंतरराष्ट्रीय फोरमवर जाणार आणि म्हणणार की, ती खूश नाहीये, ती माझ्यासोबत असायला हवी. तुम्ही आंतरराष्ट्रीय फोरमवर म्हणार की, तिचं बळजबरीने लग्न करण्यात आलं. त्यानंतर तिचा नवरा काय म्हणेल, हा आहे कोण, आता याची बायको पण मी माझ्यासोबत घेऊन येईल. मधीमधी करणाऱ्या नसलेल्या बॉयफ्रेंडला थांबवायला हवं ना... असं म्हणत याना मीर यांनी खणखणीत उत्तर दिलं.
याना मीर कोण आहेत?
याना मीर या श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरमधील एक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या महिला युट्यूबर आहेत आणि त्यांचे यूट्यूब चॅनेल असून २० लाखांहून अधिक सदस्य आहेत. याना मीर यांनी काश्मीरमधील भारतीय पत्रकार याना मीर यांनी काश्मीरवरील भारताच्या भूमिकेचे समर्थन करताना एक जोरदार युक्तिवाद सादर केला.