TRENDING:

'MAGA + MIGA = MEGA' पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतून दिला नवा नारा, असा आहे त्याचा अर्थ!

Last Updated:

पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांचे संबंध भविष्यात अधिक दृढ होतील असं सांगताना ‘MAGA+MIGA=MEGA’ हा नवा फॉर्म्युला सांगितला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्याहून भारतात परतत आहेत. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चार तास चर्चा केली. यात दोन्ही देशांतील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी दोघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांचे संबंध भविष्यात अधिक दृढ होतील असं सांगताना ‘MAGA+MIGA=MEGA’ हा नवा फॉर्म्युला सांगितला. ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ च्या धर्तीवर ‘मेक इंडिया ग्रेट अगेन’ ची घोषणा केली.
(पंतप्रधान नरेंद्र मोदी)
(पंतप्रधान नरेंद्र मोदी)
advertisement

मोदी म्हणाले, ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन (MAGA) आणि मेक इंडिया ग्रेट अगेन (MIGA) या समान दृष्टिकोनातून समृद्धीसाठी एक भागीदारी केली जाऊ शकते. या दोन्हींचा जो फॉर्म्युला पंतप्रधानांनी दिला तो MEGA होता म्हणजे उभय देशांच्या समृद्धीसाठी मेगा म्हणजे विशाल भागीदारी.’

मोदींनी समजवून सांगितला फॉर्म्युला

मोदी म्हणाले, ‘अमेरिकनांना राष्ट्रपती ट्रम्प यांची ‘MAGA- मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही घोषणा पक्की ठावूक आहे. भारतीय वारसा आणि विकासावर लक्ष केंद्रित करत आहेत कारण भारत वेगाने आणि निश्चयाने ‘विकसित भारत 2047’ च्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतो आहे. अमेरिकी भाषेतच सांगायचं तर ते ‘मेक इंडिया ग्रेट अगेन – MIGA’ असं म्हणता येईल. अमेरिका आणि भारत एकत्र काम करतात तेंव्हा ते MAGA+MIGA=MEGA म्हणजे समृद्धीसाठी एक मेगा भागीदारी तयार होते. ही MEGA भावना आमच्या उद्दिष्टांना नवा अर्थ देते.’

advertisement

मोदींनी सांगितलं व्यापाराचं उद्दिष्ट

मोदी म्हणाले, ‘आज आम्ही उभय देशांतील व्यापाराचं उद्दिष्ट 500 बिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत नेण्याचा निर्धार केला आहे. दोघांनाही फायदेशीर ठरेल अशा एका व्यापारी कराराला लवकर अंतिम स्वरू देण्यात येईल. दोन्ही देश संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन आणि उद्योगांचं हस्तांतरणाच्या दिशेने आगेकूच करत आहेत. आमची ऊर्जा सुरक्षितता राखण्यासाठी तेल आणि गॅसच्या व्यापाराला पक्कं करू. ऊर्जेच्या पायाभूत सुविधांतील गुंतवणूक वाढेल.’

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना भेटणारे मोदी हे चौथे जागतिक नेते ठरले. मोदींनी अमेरिकी उद्योजक एलॉन मस्क यांचीही भेट घेतली. ट्रम्प यांनी भारतासह इतर देशांसाठी टेरिफची घोषणा केल्यानंतर काही तासांनीच मोदींनी त्यांची भेट घेतली. पंतप्रधान आता भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मराठी बातम्या/विदेश/
'MAGA + MIGA = MEGA' पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतून दिला नवा नारा, असा आहे त्याचा अर्थ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल