TRENDING:

समुद्रात 60,000 टन इंधनाचा 'टाईम बॉम्ब', कुणीच नाही जहाजावर, फुटला तर जगावर मोठं संकट!

Last Updated:

या जहाजामध्ये 60,000 टन LNG गॅस भरलेली आहे. हा गॅस इतका धोकादायक आहे की, जर लीक झाला तर समुद्रात बर्फासारखे ढग तयार करू शकतात

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इस्त्रायल आणि इराणमध्ये पेटलेल्या युद्धामुळे आता अवघ्या जगात पडसाद उमटत आहे. समुद्रीमार्गे होणाऱ्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. इराण आणि इस्त्रायलकडून मालवाहू जहाजांवर ड्रोन हल्ले केले जात आहे. अशातच भर समुद्रामध्ये रशियाचं एक जहाज एखाद्या टाईमबॉम्ब सारखं फिरत आहे. धक्कादायक म्हणजे, या जहाजामध्ये एकही कर्मचारी नाही. इटली आणि माल्टा सारख्या देशाची या जहाजामुळे झोप उडाली आहे. या जहाजामध्ये मोठा इंधनाचा साठा असल्याचं सांगितलं जात आहे.
News18
News18
advertisement

रशियन जहाजाचं नाव आर्कटिक मेटागाज (Arctic Metagaz) असं आहे. या जहाजावर ड्रोन हल्ला झाला होता. ज्यामुळे जहाजावरील खलाश्यांनी आापली जीव वाचवण्यासाठी पळ काढला. आता हे फुटलेलं जहाज समुद्रात एकटचं फिरत आहे. या जहाजात 60,000 टनपेक्षा जास्त ज्वलनशील गॅस आणि मोठ्या प्रमाणात डिझेल असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण युरोपसाठी हे जहाज एखाद्या टाईम बॉम्ब सारखं झालं आहे. जर हे जहाज फुटलं किंवा समुद्रात बुडालं, तर भूमध्य समुद्रात मोठी आपत्ती येण्याची भीती वर्तवली जात आहे. 3 मार्च रोजी भूमध्य समुद्रात या जहाजावर समुद्री आणि हवाई ड्रोननं हल्ला  झाला होता.

advertisement

जहाजावर कुणीच नाही, मग चालवतंय कोण? 

277 मीटर लांब असलेल्या या जहाजावर एकही क्रू मेंबर नाही. समुद्रात या जहाजावर ड्रोन हल्ला झाला तेव्हा ३० कर्मचारी जहाजावर होते. जीव वाचवण्यासाठी सगळ्या कर्मचाऱ्यांनी छोट्या बोटेतून पळ काढला. हल्ल्यानंतर जहाजाची एक बाजू फुटली आहे. त्यामुळे जहाज एका बाजूने झुकलं आहे. समुद्रात पाण्याच्या प्रवाहाने हे जहाज पुढे सरकत चाललं आहे. पण, जहाजामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन असल्यामुळे दहशत पसरली आहे.  इटली सरकारने या जहाजाला आपल्या कोणत्याही पोर्टवर उभं करू देण्यास मनाई केली आहे, जर हे जहाज फुटलं तर आपल्या समुद्र किनार नष्ट होईल, अशी भीती इटली सरकारला आहे.

advertisement

जहाजामध्ये 60,000 टन इंधन

या जहाजामध्ये 60,000 टन LNG गॅस भरलेली आहे. हा गॅस इतका धोकादायक आहे की, जर लीक झाला तर समुद्रात बर्फासारखे ढग तयार करू शकतात, ज्यामुळे समुद्रातील मासेल मरू शकतात.  900 टन डिझेल जर समुद्रात पसरलं, तर इटली आणि माल्टाचे सुंदर किनारे कायमचे नष्ट होतील, अशी भीती वर्तवली जात आहे.

advertisement

युक्रेननं केला जहाजावर हल्ला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या जहाजावर कुणी हल्ला केला, याबद्दल रशियाने युक्रेन सैन्यावर आरोप केला आहे. हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली आणि ते खूप खराब झालं. तेव्हापासून हे 'शॅडो फ्लीट'चं भाग असलेलं हे जहाज बेवारस अवस्थेत समुद्रात फिरत आहे. शॅडो फ्लीट म्हणजे जुनी जहाजं जी बंदी टाळण्यासाठी चोरीनं तेल विकायला वापरली जातात. सध्या हे जहाज इटलीच्या लिनोसा बेटापासून फक्त 20 समुद्री मैल दूर आहे. माल्टा सरकारने आता तज्ञांची एक टीम पाहणीसाठी पाठवली आहे.  हे जहाज ओढून किनाऱ्यावर आणणं सुरक्षित आहे का, की ते समुद्रातच बुडवावं, याचा विचार केला जात आहे. पण, इंधनाने भरलेलं जहाज बुडवणं म्हणजे पर्यावरणाशी मोठा धोका आहे. यामुळे फक्त समुद्रातील जीव नाही, तर इटली आणि माल्टाचा पर्यटन आणि मासेमारी उद्योगही पूर्णपणे संपेल, अशा इशारा  WWF सारख्या संघटनेनं दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
समुद्रात 60,000 टन इंधनाचा 'टाईम बॉम्ब', कुणीच नाही जहाजावर, फुटला तर जगावर मोठं संकट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल