मिळालेल्या माहितीनुसार. तुर्कीमधील इस्तंबूलजवळील सिलिव्हरी इथं स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:४९ वाजेच्या सुमारास मारमारा समुद्रातून जमिनीखाली ६.९ किलोमीटर खोलीवर भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मोकळ्या जागेमध्ये लोकांनी धाव घेतली.
तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. एवढंच नाही तर इमारतींच्या नुकसानीबाबत कोणतीही माहिती समोर येत नाही. अचानक आलेल्या जोरदार भूकंपांमुळे लोकांमध्ये निश्चितच भीती निर्माण झाली. संभाव्य भूकंपाच्या धक्क्यांपासून वाचण्यासाठी अनेक लोक मोकळ्या जागेत जमले. तुर्कीमधील आपत्कालीन सेवांना सतर्क ठेवण्यात आलं आहे. इस्तंबूल आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.
advertisement
म्यानमारमध्ये ३००० लोकांचा मृत्यू
म्यानमारमध्ये झालेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर सतत धक्के येत आहेत. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ३ पेक्षा जास्त मोजली गेली. यामुळे स्थानिक लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत ३००० लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. दुसरीकडे, शेकडो लोक जखमी झाले आहेत. याशिवाय, घरे आणि इतर इमारती जमीनदोस्त झाल्या, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.
