मिळालेल्या माहितीनुसार. ही घटना रविवारी ९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडामध्ये होतं. "एका व्यक्तीने अधिकाऱ्यांवर शस्त्र उगारले, ज्यामुळे अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि गोळीबार झाला," असं गुप्तचर सेवेचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेचा तपास अमेरिकनं पोलीस विभागाच्या अंतर्गत व्यवहार विभागाच्या तपास पथकाकडून केला जात आहे. ही व्यक्ती आत्महत्या करण्याच्या मानसिक स्थितीत होती. स्थानिक पोलिसांनी त्याच्या वॉशिंग्टन डीसीला येण्याची माहिती गुप्तचर सेवेला आधीच दिली होती.
advertisement
नेमकं काय घडलं?
"सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास, एजन्सी अधिकाऱ्यांना १७ व्या आणि एफ स्ट्रीट्स एनडब्ल्यूजवळ एक संशयास्पद वाहन दिसलं. त्यानंतर, जवळून चालणाऱ्या एका व्यक्तीची ओळख पटली, जो दिलेल्या वर्णनाशी जुळत होता.” जेव्हा अधिकाऱ्यांनी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने अचानक एक बंदूक बाहेर काढली. यावर गुप्तचर सेवेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर देत गोळीबार केला.
दरम्यान, याआधी सुद्धा ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. गेल्या वर्षी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या रॅलींमध्ये तीन हल्ले झाले होते. १३ जुलै २०२४ रोजी पेनसिल्व्हेनियातील बटलर इथं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यानंतर अनेक कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या. व्हाईट हाऊसजवळील ताज्या घटनेनं सुरक्षा यंत्रणांना पुन्हा एकदा सतर्क केले आहे.
