TRENDING:

US Attack Iran Ships: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा स्ट्राइक, १६ जहाजांना उडवलं, इराणही संतापला, 'तेलाचा एकही थेंबही जगाला...'

Last Updated:

US Attack Iran Ships: अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता टोकाला पोहोचले असून संपूर्ण जग इंधन संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. होर्मुझ सामुद्रधुनी ही या युद्धात महत्त्वाची ठरली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता टोकाला पोहोचले असून संपूर्ण जग इंधन संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. होर्मुझ सामुद्रधुनी ही या युद्धात महत्त्वाची ठरली आहे. अमेरिकेने या सामुद्रधुनीत इराणवर जोरदार प्रहार केला. मंगळवारी, समुद्रात सुरुंग पेरणाऱ्या १६ जहाजांना उद्धवस्त केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. तर, इराणने आक्रमक पवित्रा घेत जगाचा तेल पुरवठा कायमचा बंद करण्याची उघड धमकी दिली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा इराणवर स्ट्राइक, १६ जहाजांना उडवलं, इराणही संतापला, 'तेलाचा एकही थेंबही जगाला...'
होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा इराणवर स्ट्राइक, १६ जहाजांना उडवलं, इराणही संतापला, 'तेलाचा एकही थेंबही जगाला...'
advertisement

होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेचा स्ट्राईक

जगातील २० टक्के तेल वाहतूक होणाऱ्या 'होर्मुझच्या सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) जवळ अमेरिकन सैन्याने ही मोठी कारवाई केली. अमेरिकेचा दावा आहे की, इराण या भागात समुद्री सुरुंग पेरत होता. इराणचे हे कृत्य जागतिक व्यापारासाठी घातक ठरले असते. अमेरिकेने या कारवाईचे व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इशारा दिला आहे की, जर इराणने हे सुरुंग त्वरित हटवले नाहीत, तर अमेरिका असा हल्ला करेल जो जगाने कधीही पाहिला नसेल.

advertisement

शत्रूला एक लिटर तेलही मिळू देणार नाही, इराणचा पलटवार

अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणने संपूर्ण जगाला वेठीस धरण्याची तयारी सुरू केली आहे. "आम्ही या भागातून होणारी सर्व तेल निर्यात रोखून धरू. आमच्या शत्रूंपर्यंत तेलाचा एक थेंबही पोहोचू देणार नाही," असा गर्भित इशारा इराणने दिला आहे. इराणच्या या निर्णयामुळे आखाती देशातून होणारा तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडण्याची भीती व्यक्त होत आहे.

advertisement

चर्चेचे दरवाजे बंद, इस्रायलवरही हल्ले सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

इराणच्या नेत्यांनी अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. युद्ध अमेरिकेने केले, मात्र ते आम्ही संपवणार असल्याचे इराणने म्हटले आहे. इराणकडून आखाती देशात असलेल्या अमेरिका-इस्रायलच्या लष्करी तळांवर हल्ले सुरू आहेत. अमेरिका-इस्रायलच्या रडार यंत्रणा उद्धवस्त केल्याचा दावा इराणने याआधी केला आहे.

मराठी बातम्या/विदेश/
US Attack Iran Ships: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा स्ट्राइक, १६ जहाजांना उडवलं, इराणही संतापला, 'तेलाचा एकही थेंबही जगाला...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल