ज्या हेलिकॉप्टरशी विमानाची धडक झाली ते सिरोस्की एच-60 प्रकारचं हेलिकॉप्टर होते. तर मीडिया रिपोर्टनुसार, ज्या विमानाला अपघात झाला, ते एक लहान आकाराचं प्रवासी विमान होतं. यात 65 लोक बसू शकत होते. अपघातावेळी विमानात 60 प्रवासी होते, असे सांगितले जात आहे. हे विमान कॅन्ससहून वॉशिंग्टनला येत होते.
एअरलाइन कंपनीने एक निवेदन जारी करत अपघाताची पुष्टी केली आहे. PSA द्वारे चालवले जाणारे अमेरिकन ईगल फ्लाइट 5342 कॅन्ससहून वॉशिंग्टनच्या रीगन विमानतळावर येत होतं. ज्याचा अपघात झाला आहे.
advertisement
अमेरिकन सिनेटर टेड क्रूझ म्हणाले की, या दुर्घटनेत काहीजणांचा मृत्यू झाला आहे. मात्र विमानात किती लोक होते, याची अधिकृत माहिती आम्हाला अद्याप मिळाली नाही. या अपघातानंतर रीगन विमानतळावरची विमानसेवा रोखण्यात आली आहे. या विमान अपघातानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवेदन जारी करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. निवेदनातून त्यांनी रीगन विमानतळावर झालेल्या अपघाताची माहिती दिली असून मृत प्रवाशांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच या संपूर्ण परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत, असंही निवेदनात म्हटलं आहे.
