TRENDING:

जगातल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीचा शोध, भारताच्या GDPपेक्षाही आहे जास्त किंमत

Last Updated:

चीनमध्ये सापडलेल्या सोन्याच्या साठ्याचं मूल्य 600 अब्ज युआन म्हणजे अंदाजे 6,91,473 कोटी रुपये आहे. ही रक्कम भारताच्या जीडीपीपेक्षा दुप्पट आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोन्याचा समावेश जगातील सर्वांत मौल्यवान धातूंमध्ये होतो. त्यामुळे त्याला जगभरात मागणी वाढत आहे. अशातच आता चीनमध्ये सोन्याचा जगातील सर्वांत मोठा साठा सापडल्याचा दावा केला जात आहे. हुनान प्रांतातील खनिजशास्त्रज्ञांनी मध्य चीनमधील पिंग्झियांग काउंटीमध्ये हा शोध लागल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या साठ्यामध्ये 1,000 मेट्रिक टन उच्च दर्जाचं सोनं असल्याचं म्हटलं जात आहे.
News18
News18
advertisement

चीनमधील सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या साठ्याचं मूल्य 600 अब्ज युआन म्हणजे अंदाजे 6,91,473 कोटी रुपये आहे. ही रक्कम भारताच्या जीडीपीपेक्षा दुप्पट आहे. अंदाजे मूल्याचा विचार केल्यास हा जगातील सर्वांत मोठा सोन्याचा साठा असू शकतो. सुरुवातीच्या शोधात, जमिनीपासून दोन किलोमीटर खोलीवर शुद्ध सोन्याने भरलेल्या 40 भेगा सापडल्या होत्या. त्यामध्ये अंदाजे 300 मेट्रिक टन सोनं आहे. यानंतर पुढील शोध घेण्यात आला. 3D मॉडेलिंगचा वापर केला असता, जमिनीत अधिक खोलवर अतिरिक्त साठे अस्तित्वात असल्याचं निदर्शनास आलं आहे. जमिनीपासून जवळपास तीन किलोमीटर खाली सोनं अस्तित्वात आहे. या शोधाचा चीनमधील सुवर्ण उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे.

advertisement

या प्रकरणाशी संबंधित असलेला एक अधिकारी म्हणाला, "अनेक ड्रिल केलेल्या रॉक कोअरमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं आढळलं आहे. दोन हजार मीटरच्या श्रेणीत जास्तीत जास्त 138 ग्रॅम सोनं असतं. वांगू गोल्ड फिल्डमध्ये थ्रीडी मॉडेलिंगसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे."

दक्षिण आफ्रिकेतील साउथ डीप गोल्ड माईन (930 मेट्रिक टन), इंडोनेशियातील ग्रासबर्ग गोल्ड माईन, रशियातील ऑलिम्पियाडा गोल्ड माईन आणि दक्षिण आफ्रिकेची मपोनेंग गोल्ड माईन यांचा जगातील प्रमुख सोन्याच्या साठ्यांमध्ये समावेश होतो. यापैकी साउथ डीप गोल्ड माईनमध्ये सध्याचा सर्वांत मोठा साठा आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

भारतातदेखील सोन्यासाठी उत्खनन होत असे. पण, आता या खाणींमधून सोनं काढणं जवळपास बंद झालं आहे. कर्नाटकातील कोलार येथील सोन्याच्या खाणी प्रसिद्ध आहेत. भारतात सोन्याचं उत्खनन होत नसलं तरी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्था सातत्याने सोन्याचे साठे शोधण्याचं काम करत आहे. काही महिन्यांपूर्वी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने दावा केला होता की, बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सोनो ब्लॉकमधील करामतिया येथे देशातील सर्वांत मोठा सोन्याचा साठा आहे. या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, जमुई जिल्ह्यात सुमारे 222.88 दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे. सरकारने उत्सखननास परवानगी दिली तर भारतात पुन्हा सोन्याच्या खाणी तयार होतील.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
जगातल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीचा शोध, भारताच्या GDPपेक्षाही आहे जास्त किंमत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल