TRENDING:

11 वर्षाच्या मुलाने वडिलांना रातोरात करोडपती बनवलं; पण कसं? जाणून व्हाल थक्क

Last Updated:

11 वर्षाच्या मुलाने खेळातच 50 लाख रुपये जिंकले. ही बाब वडिलांना कळताच त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली 02 फेब्रुवारी : जर मुलं हुशार असतील, तर अनेकदा कुटुंबाला त्यांचा अभिमान वाटतो. काही मुलं त्यांच्या मेहनतीमुळे कुटुंबाला नवीन उंचीवर घेऊन जातात; पण आता एक वेगळं प्रकरण समोर आलं आहे. 11 वर्षाच्या मुलाने खेळातच 50 लाख रुपये जिंकले. ही बाब वडिलांना कळताच त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी असं काही केलं, की सोशल मीडियावर नव्या चर्चेला उधाण आलं..
लॉटरीचं तिकीट जिंकलं (प्रतिकात्मक फोटो)
लॉटरीचं तिकीट जिंकलं (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

मिररच्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीने Reddit वर आपली स्टोरी शेअर केली आहे. त्याने सांगितलं, 6 वर्षांपूर्वी मी सिगारेट घेण्यासाठी गॅस स्टेशनवर गेलो होतो. मग मी काही लोक लॉटरीची तिकिटे खरेदी करताना पाहिले. फक्त गंमत म्हणून मी माझ्या मुलांच्या नावाने लॉटरीची तिकिटेही घेतली. माझा मुलगा सॅम तेव्हा 11 वर्षांचा होता. यानंतर आम्ही रात्रभर बोलत राहिलो की आम्ही जिंकलो तर काय करणार? आम्ही कुठे जाणार? पण हे सगळं कल्पनेत होतं. आम्ही हे फक्त गंमत म्हणून करत होतो. पण एके दिवशी सकाळी मला आश्चर्य वाटलं.

advertisement

त्या व्यक्तीने सांगितलं की, सकाळी त्याला समजलं की त्याने आपल्या मुलाच्या नावाने खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकिटाने 47,000 पौंड म्हणजेच सुमारे 50 लाख रुपयांचा जॅकपॉट जिंकला होता. यानंतर माझ्या आनंदाला सीमा राहिली नाही. मला समजत नव्हतं की आता या पैशाचं करायचं काय? कारण इतके पैसे मी कधीच पाहिले नव्हते. मला रात्रभर झोप आली नाही. मग मी विचार केला की मी माझ्या मुलाला हे कसं सांगू? पैसा त्याचा आहे, यातील त्याला किती पैसे द्यायचे?

advertisement

मग मी घरच्यांना एकत्र बसवलं. सर्वांना सांगितलं की सॅमने लॉटरी जिंकली आहे, पण आपण हे पैसे वाया घालवणार नाही. हे सगळे पैसे मी वाचवणार आहे जेणेकरून सॅमच्या कॉलेजची व्यवस्था मला करता येईल. तो माणूस म्हणाला, माझ्या पत्नीला फॅमिल‍ी हॉल‍िडेवर जायचं होतं, नंतर मीही होकार दिला. मुलाला गेमिंग सिस्टम आणि बरेच गेम्स हवे होते, म्हणून त्याला सुमारे 800 पौंड दिले. गेल्या वर्षी सॅमला कार हवी होती. आम्ही त्याला कार मिळवून दिली. असं असूनही, आमच्याकडे अजूनही भरपूर पैसे शिल्लक आहेत, जे आम्ही त्यावर खर्च करू इच्छितो. कारण हे पैसे त्याने जिंकले आहेत.

advertisement

.

मराठी बातम्या/Viral/
11 वर्षाच्या मुलाने वडिलांना रातोरात करोडपती बनवलं; पण कसं? जाणून व्हाल थक्क
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल