33 वर्षांची ही महिला. माहितीनुसार 10 ऑक्टोबर रोजी महिलेने करवा चौथचा उपवास ठेवला होता. पहाटे 4 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत उपवास केला. यादरम्यान खाणं सोडा ती साधं पाणीही प्यायली नाही. उपवास सोडणार त्याआधीच रात्री 9.30 च्या सुमारास ती अचानक खालीच कोसळली. तिच्या नवऱ्याने सांगितलं की तिचा चेहरा एका बाजूला झुकला आणि तिला वॉटर प्युरिफायर सुरू करणंही शक्य झालं नाही.
advertisement
कुटुंबीयांनी तिला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. जिथं तिला स्ट्रोक आल्याचं निदान झालं. पण तिथं न्यूरोलॉजिस्ट नसल्याने तिला रक्त पातळ करण्याचं थ्रोम्बोलिटिक इंजेक्शन दिल्यानंतर मीरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.
मीडिया रिपोर्टनुसार वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉ. पवन पै यांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की, तिच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धमनीमध्ये एक मोठी रक्ताची गाठ दिसली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता तिची मेकॅनिकल थ्रोम्बेक्टोमी ही तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्याद्वारे ती रक्तगाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. अवघ्या काही तासांत तिच्या शरीराच्या डाव्या बाजूच्या हालचालीत सुधारणा झाली आणि वेळेवर उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला.
सुहागरातसाठी सजवली खोली, बेडवर फुलांसोबत लटकवलं असं काही, लोक टकामका पाहतच राहिले
डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत सांगितलं की, डिहायड्रेशन हेच स्ट्रोकचं प्राथमिक कारण होते. डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होतं आणि यामुळे रक्त गोठून स्ट्रोकचा धोका वाढतो.
ही घटना करवा चौथची असली. तरी वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्ताने डॉक्टरांनी लोकांना जागरूक करण्यासाठी या प्रकरणाबाबक माहिती दिली आहे.
