एक तरुण आजारी होता आणि तो मानसिक आजारानं त्रस्त होता. यामुळे त्याला नाणी, चुंबक खाण्याची सवय लागली. 26 वर्षीय तरुणाची ही सवय त्याच्याच जीवावर बेतली आणि शेवटी ऑपरेशन करावं लागलं.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 20 दिवसांपासून त्याला वारंवार उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर कुटुंबीय रुग्णाला रुग्णालयात घेऊन गेले आणि ऑपरेशननंतर त्याच्या पोटातून नाणी आणि चुंबक बाहेर काढण्यात आलं. रुग्णाला सर गंगाराम रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
advertisement
Bangalore Video : मळालेले कपडे पाहून शेतकऱ्याला मेट्रोमध्ये चढू दिलं नाही, VIDEO ने खळबळ
रुग्णाच्या नातेवाइकांनी त्याच्या पोटाचा एक्स-रे काढला, ज्यामध्ये त्याच्या पोटात नाणी आणि चुंबकाच्या आकारात रेडिओ-अपारदर्शक गोष्ट दिसून आली. पोटाच्या सीटी स्कॅनमध्ये असं दिसून आलं की नाणी आणि चुंबकांच्या प्रचंड भारामुळे आतड्यात त्रास निर्माण होत आहे. त्यानंतर तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, दिल्लीतील ही घटना सध्या चांगली व्हायरल होतेय. रुग्णाला त्याच्या शरीरात झिंकची कमतरता असल्याचं समजलं, म्हणून त्यानं 39 नाणी आणि 37 चुंबक गिळले.
