कर्नाटकच्या गदगमधील ही धक्कादायक घटना आहे. 24 वर्षीय महिला जिचं नाव पूजा. 4 महिन्यांपूर्वीच तिचं अमरेश नावाच्या तरुणाशी लग्न झालं होतं. लग्नाच्या 4 महिन्यांनंतर तिनं आत्महत्या केली आहे. 15 एप्रिलला सासरच्या घरी तिनं गळफास घेतला.
advertisement
मुलीच्या पालकांनी तिच्या मृत्यूसाठी तिचे सासरचे लोक कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी तिच्या सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या आई-वडिलांनी तक्रार दिली आहे. पूजाची सासू शशिकला आणि नवऱ्याचा मोठा भाऊ वीरनगौडा तिला त्रास द्यायचे. काळी म्हणून टोमणे मारायचे. इतकंच नव्हे तर तिचं नावही काली ठेवलं होतं. ज्यामुळे ती दुःखी होती.
सगळे गाढ झोपेत होते, अचानक आला मोठा आवाज, नागपुरातील घटनेने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ
नवभारत टाइम्सने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अमरेश एका खासगी कंपनीत नोकरी करायचा. त्याचं ट्रान्सफर होणार होतं. त्यानंतर तो पूजाला आपल्यासोबत घेऊन जाणार होता. त्याने पूजाला थोडा संयम ठेवायला सांगितला होता पण तिनं टोकाचं पाऊल उचललं. पोलीस या प्रकरणाचा तपास अद्याप करत आहेत. पोलिसांनी तिची सासू आणि दीर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.